पदसंग्रह - पदे २८१ ते २८५
रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.
पद २८१. (चाल यारे सज्जनहो यारे.)
परिसारे संसार सार कसा रे ॥ मायिक सर्व पसारे निजसुरे कांरे सारे ॥ रगडिल काळ घसा रे ॥
यातना भव वळसा रे ॥ लुब्ध कां विषयरसां रे ॥ षडैवरि प्रध्वंसा रे ॥ साधुसि वृत्ति पुसा रे ॥धृ०॥
अरे जागा सच्छास्त्रप्रमेय विभागा ॥ इह परत्र भोगा त्यागा ॥ साधुनि शम दम योगा ॥ अनुरागें गुरुपदिं लागा ॥
अक्षय अभय अभय वर मागा ॥ निस्तरुनियां भवरोगा ॥ साम्राज्य पदवी भोगा ॥ निर्द्वंद्व सदनीं वागा ॥१॥
अरे या या या पथेचि सर्व तराया ॥ वैराग्ययोगें काया ॥ श्रमविली स्वहित कराया ॥ ब्रह्मैक्य भावें माया ॥
ग्रासिली स्वपद वराया ॥ निजरंग पदीं रमले या ॥ विसरे आप-परा या ॥ निजरुप आपुलें ध्याया ॥२॥
पद २८२. (चाल अभाग्याचा घरीं०)
आपुलीच क्रिया आपणा तारक मारक ॥धृ०॥
आपण श्रीगुरुसी भजतां ब्रह्मु सायोज्यता ॥ न भजतां जाणें अध:पाता ॥१॥
आपणें हरि ह्रदयीं धरणें सुख स्वरुप होणें ॥ विषयासक्तीं नरक भोगणें ॥२॥
आपणें मानितां भेद ॥ विश्व अवघेंचि बद्ध ॥ अभेदीं रंग निजानंद ॥३॥
पद २८३. (राग सुलतानी.)
कां भार वाहुं उगा संसारिंचा ॥धृ०॥
मृगजळाच्या लोटें वाहवला ॥ कोण कोठें निश्वय हा गुरुद्वारिंचा ॥१॥
प्राचिन कर्ममेळें तनु हे सर्वत्र खेळे ॥ साक्षी निश्चित मी सर्वांचा ॥२॥
तापत्रयें तापला न वचें मीं व्यापला ॥ निजानंद रंगीं रंगला साचा ॥३॥
पद २८४. (राग सारंग)
गुरु देवदेवा करुणासागरा निजमूर्ती ॥धृ०॥
रति धरिली अंत:करणें ॥ विषयीं वेधलीं करणें ॥ भव तरणें कैसें रे ॥१॥
ममता नावरे पापी ॥ तृष्णा त्रैलोक्यवापीं ॥ नाहिं तृप्ति ह अद्यापि ॥२॥
आकळिले पंचकोशी ॥ छळिले तापत्रय दोषी ॥ गिळिलें निर्दळिलें राम द्वेषी ॥३॥
विवेक दीपक हा लावी ॥ हारपलों मज मी दावीं ॥ देउनि निजशांती भ्रांती न्यावी ॥४॥
विवि्धें भेदत्रयछंदें ॥ वारुनि प्रतिबंधें द्वंद्वें ॥ निज भजनीं रंगविं निजानंदें ॥५॥
पद २८५.
निजमूर्ति रामा येरे येरे येरे ॥धृ०॥
विश्वप्रकाशदीपा ॥ अनंता चित्स्वरूपा ॥ जीवा जीवन तूं अरूपरूपा ॥१॥
नि:शब्द सांग गोष्टी ॥ शून्य संकल्प पोटीं ॥ अनंग अंगें देईं भेटी ॥२॥
योग वियोग भंग ॥ करिं नि:संग संग ॥ निजीं रंगविं आत्मरंग ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP