मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह|
पदे ३६६ ते ३७०

पदसंग्रह - पदे ३६६ ते ३७०

रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.


पद ३६६.
त्राहि त्राहि रामा मुनिजनमनविश्रामा ॥ असंगविभु निष्कामा अपरिमित गुणग्रामा ॥
अचळ अढळ परिपूरित निर्मळ सकळ मंगळधामा ॥धृ०॥
वंदुनियां पदकमळा रे कमळोद्भव कुळबाळा ॥ करयुग लावुनि भाळा विनवी त्रिभुवनपाळा ॥
कोटिशतें अपराध मातेपरि तारक तूंविच दयाळा ॥१॥
सच्चिद्धन श्रुति सारा रे सुखमय सहज अपारा ॥ विधि हर नेणति पारा रे अव्यय अज अ-विकारा ॥
शेष रसा महिमा न जाणति अनुपम जगदाधारा ॥२॥
नेति वदति साहा चारी अकळ कळा नटधारी ॥ सगुण लीलावतारी चिन्मय रूप मज तारीं ॥
करुणाकर शिरीं ठेवित रघुविर तन्मय ब्रह्मकुमारी ॥३॥
अंतर पूर्ण निवालें न बोलवे सुख बोलें ॥धृ०॥
पूर्ण जळीं जळबिंदू तेथें मिळणीं भेद पळादा ॥ विधितनया रघुराया रे अंतरीं हेतु गळाला ॥
रंग तरंग निजानंद जलधिमाजीं अभंग मिळाला ॥४॥
निर्विचार पदबोधीं सहजिं सहजसमाधी ॥धृ०॥

पद ३६७.
येईं येईं प्राणसखया गोपाळराया ॥धृ०॥
सुमती द्रौपदी बाळा कौरव षड्‌वैरी काळा ॥ हातीं सांपडली वेल्हाळा ॥ वाहे गोपाळा ॥१॥
विषय विराग्य स्वरूपें ॥ तापली तापत्रयें तापं ॥ बोले मंजुळ अनुतापें ॥ दींनार्तिरूपें ॥२॥
येईं येईं कृष्णे जननीये करणे वो काय ॥धृ०॥
जीवनें भरले डोळे ॥ धरिले तन्मय लीळें ॥ बोलें व्यापक घननीळे ॥ पाहें ये वेळे ॥३॥
येईं येईं कृष्णराजया जीवना माझिया ॥धृ०॥
सरली वो सरली काया ॥ हरली जीविताची माया ॥ वेधली श्रीकृष्णपायां ॥ पांडवजाया ॥४॥
मन हें उन्मन आनंदीं गोपाळछंदीं ॥धृ०॥
कृष्णरूपीं करितां धावा ॥ विसरली देहभावा ॥ आठविला सौख्य विसावा ॥ मुनिमानस-ठेवा ॥५॥
मन हें उन्मन आनंदीं गोपाळछंदों ॥धृ०॥
सहज समाधी हरिखें हरपलीं द्वंद्वदु:खें ॥ रंगीं रंगली निजसौख्यें ॥ श्रीकृष्ण देखे ॥६॥
अनुभविये जाणती ते गोडी स्वानंदजोडी ॥धृ०॥

पद ३६८.
सखया यादवराया मज जाचिति कौरव वायां ॥ व्याकुळ चित्तें बाहे पांडवज या ॥धृ०॥
हांसती सकळ जगीं मग करणें देवा काय ॥ द्रौपदि ह्मणे कृष्णा बारे वंदिन तुझे पाय ॥
लज्जा जाय करूं मी काय ये ये हाचि उपाय ॥१॥
कैं दवडादवडीं येसी चरण झाडिन केशीं ॥धृ०॥
जनक जननी बधु सजण निजसांगाती ॥ तुजविण दिशा दाही या उद्वस मज वाटती ॥
काकुळती कवणाप्रति शरणागता तूंचि गती ॥२॥
उदास करिसी बारे तरि मारुनि मजला जारे ॥धृ०॥
व्यापक केला ॥ शोक मोहो समूळ ठेला सर्वरंगीं कृष्णचि झाला ॥३॥
आकळ सुख तें पाहें तेथें बोलही न साहे ॥धृ०॥
वेधली श्रीकृष्णपायां ॥ पांडवजाया ॥४॥
मन हें उन्मन आनंदीं गोपाळछंदीं ॥धृ०॥
कृष्णरूपीं करितां धावा ॥ विसरली देहभावा ॥ आठविला सौख्य विसावा ॥ मुनिमानस-ठेवा ॥५॥
मन हें उन्मन आनंदीं गोपाळछंदों ॥धृ०॥
सहज समाधी हरिखें हरपलीं द्वंद्वदु:खें ॥ रंगीं रंगली निजसौख्यें ॥ श्रीकृष्ण देखे ॥६॥
अनुभविये जाणती ते गोडी स्वानंदजोडी ॥धृ०॥

पद ३६९.
बोले विवेक निजगुज ऐक वो बुद्धिबाळे ॥ जीव तुझ्या संगें नानाविध सोंगें खेळ खेळे ॥
अधम ते प्रतिपादिसि उत्तम कोण चाळे ॥ हो झालें तें आतां शरण गुरुसि ये एक वेळे ॥१॥
अहंकार ह्मणे प्रज्ञ सुलक्षणे सांगों कायी ॥ विवेक हा चोर नको यासमोर जाऊं बाई ॥
पुर्यष्टकीं गुप्त त्या करीं संतप्त याची घाई ॥ तुझें माझें मूळ जगोसि निर्मूळ याचे पायीं ॥२॥
साधू विवेक हितावह बोलत बुद्धि माय ॥ देहंद्रिय प्राण विषयसमुह जाण साच काय ॥
याचें भोक्तेपण तुज जीवा शीण होतं जाय ॥ व्यर्थ औडंबर हा जगडंबर स्वप्नप्राय ॥३॥
विवेकाचे बोल परिसुनियां बुद्धि सावध झाली ॥ सर्व दयाळु साधु तयांप्रति शरण गेली ॥
ह्मणे तापत्रयीं श्रमलें गुरुवर्या धांव घालीं ॥ साधनयुक्त अनन्य विलोकुनि कृपा केली ॥४॥
बुद्धी परावृत्तियोगें जीव सुखें डोलताहे ॥ स्वपद पावुनियां धन्य कृतार्थ मी बोलत आहें ॥
मातला पूर्ण निजानंद वारिधी खेळताहे ॥५॥

पद ३७०.
जागें जागें रे प्राणियां जागें आपुल्या हिता ॥ प्रबोध पहिले जाहले नका राहुं दु:श्चिता ॥धृ०॥
पावन किं नरदेह हा नये नये मागुता ॥ पाहें विचारुनि अंतरीं होईं सावध आतां ॥१॥
करीं स्वधर्मसंस्थापना धरीं आवरीं मना ॥ मारुनिया आसुरी सेना छेदीं भवबंधना ॥२॥
निजानंद-पद साधुनि नित्य अभंग रंगें ॥ याविण तो शीण सर्वथा दु:ख मीपणसेंगें ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP