पदसंग्रह - पदे १८१ ते १८५
रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.
पद १८१.
परम पुरुषार्थी महाराज संत रे ॥ ब्रह्मादिकां न कळे ज्यांचा अंत रे ॥धृ०॥
समुळीं मन बुद्धी चित्त अहंकार रे ॥ यांच्या वृत्ति केल्या ब्रह्माकारे रे ॥१॥
काम समुळीं आत्माराम केला रे ॥ अधिष्ठानीं अलभ्य लाभ झाला रे ॥२॥
एक सत्ता हातासी गुणग्रामीं रे ॥ आली ऐसे बळिवंत पराक्रमी रे ॥३॥
तुच्छ द्दष्टी ब्रह्मांड विषय ज्यांच्या रे ॥ चारी मुक्ती लागती पायां त्यांच्या रे ॥४॥
षड्गुणैश्वर्यसंपन्न भूदेव रे ॥ सगुण ब्रह्म हे संत महानुभाव रे ॥५॥
मोक्ष श्रीमंत संत अक्षयी रे ॥ सच्चित् सुख भोगिती सर्वान्वयीं रे ॥६॥
त्यांचा महिमा अपार वर्णूं काय रे रंगीं रंगले निजानंद राय रे ॥७॥
पद १८२.
नारायण करुणासिंधु कळलें मज बाई वो ॥धृ०॥
धर्म संस्थापनेंस्तव अवतार धरणें वो ॥ दुष्टांचा निग्रह शिष्ट प्रतिपाळण करणें वो ॥
गीतेंत ह्रषिकेश ॥ स्वमुखें बोलिला ऐसें ॥ ठायिंच्या ठायीं वो ॥१॥
पूर्वीं संकटें हरिलीं बहुतांचीं येणें वो ॥ बहुतांच्या मुखें ऐकत होतें श्रवणें वो ॥
हो काते महा दोषी ॥ स्मरतां भवभय नाशी ॥ हा शेषशायी वो ॥२॥
पींडीं प्रत्यय पाहावा शब्दें विश्वास वो ॥ आला आला हा कृष्ण मुनिमानसहंस वो ॥
निजरंगें रंगला पूर्ण ॥ जग-नग पाहातां चित्सवर्ण बोलों तें काई वो ॥३॥
पद १८३.
तुज म्यां नामरुपा आणिलें ॥धृ०॥
नामरूपें पांचामाजिं चोहटा ॥ आणुनि बैसविलें ॥१॥
कर्म क्रिया गुण वर्ण व्यक्तिपण ॥ हें माझें केलें ॥२॥
येर्हविं कोण तुज जाणत होतें ॥ तूं जित ना मेलें ॥३॥
अक्षत मात्र तुझी मज वरि पडिली । तेंचि निमित्त झालें रे ॥४॥
भाज तूं निलज्ज ह्मणसि मज ॥ निजरंगें नांदविलें रे ॥५॥
पद १८४.
सर सर परती तोंडाळे भांडखोरे ॥ वटवट करिसी अलगटे तूं अनिवारे गे ॥
मज करितां तुज म्हणती सर्वधारे गे ॥ म्हणउनि फुगों नको वेडे तूं अनिवारे गे ॥धृ०॥
मी बीजकणिका तूं कोंडा जगदाकारे गे ॥ माझे सत्तेवरि व्यापकपन तुझें सारें गे ॥
शोभे काजळ कुंकु एका अहवदोरें गे ॥ पतिसुक तेथें मंगळें सर्वही सारें गे ॥१॥
तूं जग मृगजळ मी चिद्भानू चिदाकाशीं गे ॥ नर-मृग अज्ञानी जळ महणती तुजला कैसें गे ॥
तूं महामाया आंगींची छाया जैसी गे ॥ मी तो नि:संग मधुसूदन अज अविनाशी गे ॥२॥
अभ्रपटलें लोपला म्हणती सूर्य गे ॥ तुझा माझा संबंध जाणती विद्वद्वर्य गे ॥
सहज निजरगी हें पूर्ण बीर्य शौर्य गे ॥३॥
पद १८५.
ज्ञान-धनें ज्ञानी ॥ सुखमय नित्य धानढय मनीं ॥धृ०॥
अक्षयी लक्ष अलक्ष अगोचर ॥ विश्वीं विश्वंभर नित्य निरंतर ॥१॥
अव्यय निर्भय पूर्ण सनातन ॥ नामरूफातीत सच्चित्सुखघन ॥२॥
सुगम समीप सुखावह शाश्वत ॥ निजरंगें परमामृत सेवित ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP