मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह|
पदे १०१ ते १०५

पदसंग्रह - पदे १०१ ते १०५

रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.


पद १०१. (श्रीहरिहरस्तोत्र.)
विष्णु सदाशिव श्रीधर शंकर अच्युत त्र्यंबकराज नमो ॥
कृष्ण शशीधर माधव पार्वतिकांत जनार्दन ईश नमो ॥१॥
हे गरळाशन केशव हे भव राम उमापति शंभु नमो ॥
हे पुरुषोत्तम हे हर वामन हे मदनांतक देव नमो ॥२॥
सांब त्रिविक्रम पन्नगभूषण वामन भर्ग नृसिंह नमो ॥
नारायण निलकंठ गिरीधर भालचंद्र गोविंद नमो ॥३॥
हे विरुपाक्ष रमावर हे मृड वासुदेव शुळपाणि नमो ॥
श्रीहरि रुद्र उपेंद्र त्रिलोचन हे मधु-सूदन देव नमो ॥४॥
पशुपति संकर्षण गंगाधर पद्मनाभि महादेव नमो ॥
स्तोत्र हरी हर नाम निंरतर पूर्ण रंगवर नित्य नमो ॥५॥

पद १०२.
नवविधा भक्ती करुनी हरिजन हरिभजनें तरले ॥धृ०॥
भगवद्बक्त श्रवणें नृपती ॥ पावन झाला परिक्षिती ॥
श्रीशुकमुखें श्रीभागवतीं ॥ बहु जन्माचे श्रम हरले ॥१॥
ब्रह्मानंद संकीर्तनीं ॥ ब्रह्मस्वरूप नारदमुनी ॥
विचरे स्वच्छदें चिद्भुवनीं ॥ मनिंचे मनोरथ पुरले ॥२॥
भगवद्भक्तशिखामणी ॥ प्रर्‍हाद तो नरहरिस्मरणीं ॥
उदया आला चित्सुखतरणी ॥ अघटित करणि किरण भरले ॥३॥
पद संवाहन करितां रमा ॥ पूर्ण पावुनियां उपरमा ॥
स्तवितां परात्परतर परमा ॥ निगमा गरिमा न बोलवे ॥४॥
पृथुराज तो राजनिधी ॥ भगवत्पूजन यथा विवी ॥
करुनि गंगा मिनली उदधी ॥ तैसा तन्मय भगवंतीं ॥५॥
भगद्नाव सर्वांभूतीं ॥ सर्वहि श्रीविष्णुच्या विभुती ॥
जाणुनियां हे वंदन भक्ती ॥ पूर्ण केली अक्रुरें ॥६॥
वाचा मन काया त्रिकरणें ॥ अनन्य भावें दास्य करणें ॥
ज्याच्या दिक्षाग्रहणें तरणें ॥ भव-निवि स्मरणें मारुतिच्या ॥७॥
हरिजन हरितनु एकरूप ॥ तो नर नारायण चित्स्वरूप ॥
सख्य अर्जुनाचें तद्रूप ॥ दिपें दीप लावियला ॥८॥
नाहं देह न मे देहो ॥ स्वात्मनिवेदन निज विर्वाहो ॥
बळिचे द्वारीं रमानाहो ॥ निजानंदें रंगला ॥९॥

पद १०३. (चाल न्हाणी न्हाणी त्या.)
आमुचि चिंता भगवंत कमळाकांता ॥
असतां करणें दु:श्वित मन कां हो आतां ॥धृ०॥
माता जनिता सुत वनिता दुहिता भ्राता ॥ लावुनिममता वाढविती विपुल अहंता ॥
विषयीं रमतां जड भ्रांता कैंची समता ॥ श्री हरि दाता दापयिता कळलें पाहातां ॥१॥
भावें भजतां अच्युतानंता भक्तां ॥ चिंता ह्मणतां विषमता वाटे चित्ता ॥
हातां येतां स्वप्रकाशघन चित्सविता ॥ श्रवणीं स्वप्नींही न पडे भव तमवार्ता ॥२॥
भवभयत्राता सर्वात्मक सर्वनियेंता ॥ परेहुनि परता तत्वता वेद-विधाता ॥
प्रमाण नेणें प्रेमयाचा कवण प्रमाता ॥ निजानंदीं रंगली एक सत्ता ॥३॥

पद १०४.
तो नर हरितनु अवलोकी ॥ या मानवलोकीं ॥धृ०॥
चिन्मय चंद्र सुशीतळ सोज्वळ न लिंपे रजतमपंकीं ॥
शुक्लकृष्ण द्वयपक्षरहित जो निर्विकार अकलंकीं ॥१॥
लक्षघटी परिपूर्ण बिंबला व्यापक एक अनेकीं ॥
नाम-रूप-गुण-वर्ण-व्यक्तिविण शुष्क न जो जळ शोकीं ॥२॥
पार अपार कळेना गुणगण पूर्ण न गणवे अंकीं ॥
निजरंगें रंगोनी स्वच्छंदें विचरे उत्तमश्लोकीं ॥३॥

पद १०५.
ऐसा हा अगणित महिमा न बोलवे हरिभक्तांचा ॥धृ०॥
पशुमुखें ज्ञानेश्वरें ॥ वेद बोलविला निर्धारें ॥
मृत्यु पावलीं तीं पितरें ॥ श्राद्धिं आणिली द्विजाचीं ॥१॥
असद्नुण अरोपण वैरें ॥ दुर्विष देतां मातापितरें ॥
स्वीकारिलें तें गिरिधरें ॥ मिराबाई सुखरूप ॥२॥
पुराणपुरुषें अवाप्तकामें ॥ मुद्रा देउनि रघूत्तमें ॥
दीप संरक्षिला नेमं ॥ महा मुद्नल स्वामीचा ॥३॥
वैकुंठीचें ब्रह्म सगूण ॥ येउनि सेवा करी आपण ॥
ह्मणवी श्रीखंडया बाह्मण ॥ एकनाथ निजगेहीं ॥४॥
राम रायें देतां सुशुळीं ॥ तरु अंकुरला पुष्पीं फळीं ॥
भानुदास तये काळीं ॥ निजानंदे रंगला ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP