मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह|
पदे १ ते ५

पदसंग्रह - पदे १ ते ५

रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.


पद १.
राग यमनकल्याण.
पुर्वीं गणाधिशा स्मरावें ॥ भजनें दुरित हारावें ॥धृ०॥
सुरवर नर किन्नर ॥ विद्याधर पन्नग गण गंधर्वीं ॥१॥
दुस्तर भवसागर तरणें ॥ तरि करणें हें सर्वीं ॥२॥
नि:संगें निजरंगें आत्म ॥ स्थिति साधावी वरवी ॥३॥

पद २.
रामंनिजमूर्ति षडक्षरी मंत्रराज रे ॥ जपतां अनुदिन वाचे सिद्धी पावलें निज काज रे ॥धृ०॥
रामायण शतकोटी वदला वाल्मिक ऋषी जाणूनि रे ॥ राहुनि बद्धांजुळी सुरवर तिष्ठती कर जोडूनिरे ॥
रक्षसगण नेतील तरतिल अवलंबें ह्मणउनि रे ॥ रात्रंदिन शिव स्तवितां हर मृड संतोषे शूळपाणी रे ॥१॥
महादेवें समभागें विभाग करुनि तिहिं ठायीं रें ॥ मनुन्य देव पन्नग संबोखिले ते लवलाहीं रे ॥
मग उरलीं अक्षरें दोनी तीं शिव मागे पाही रे ॥ मन हें उन्मन झालें रामस्मरणें शीतळ देहीं रे ॥२॥
निर्गुण परात्पर ब्रह्मादिक सुरवर नर ध्याती रे ॥ नित्य निरामय चिन्मय तन्मय  होउनियां श्रुति गाती रे ॥
निगमागमिंचें सार पार नकळे कवणा-प्रति रे ॥ निर्मळ निश्वळ निष्फळ अज अव्यय आदि अंतीं रे ॥३॥
जयासि पाहातां कांहीं पाहातेपणही उरलें नाहीं रे ॥ जन्मजरामरण यांच्या न पडे जें प्रवाहीं रे ॥
जळीं स्थळीं काष्ठीं लोष्टीं देहीं आणि गेहीं रें ॥ जग नग चित्सुवर्णीं कार्य कारणातित पाहीं रे ॥४॥
मुख पाहातां दर्पणीं द्दश्य द्रष्टा दर्शन तिन्हीं रे ॥ मर्तिमंत पुढें उभीं राहाति तीं तत्क्षणीं रे ॥
मुरडुनि सद्नुरुकृपें अवलोकितां आत्मज्ञानीरे ॥ मुमुक्षु मुक्त झाले एकीं एकपणहि नुरवुनि रे ॥५॥
तिमिरांधविध्वंसक सच्चित्‌ सुखमय रवि उगवला रे ॥ तिळ तुल्य द्दष्टांत नाहीं बोलावया बोला रे ॥
तीक्ष्ण हें महा शस्त्र स्मरणें निवटित कळिकाळा रे ॥ तिहीं भुवनीं पाहातां रामनिजमूर्ति रंगला रे ॥६॥

पद ३.
गुरु हे दोनिच वर्ण पूर्ण चित्सुवर्ण जाणा ॥ जग नग कार्याकारण हा कृत निश्चय कां नेणा ॥धृ०॥
गुरुवर गरिमा अनुदिन वर्णिति सुरगुरु आणि भृगु ॥ गुणत्रयातीत ब्रह्म सदोदित अनुपम पद मागुं ॥
गुप्त प्रकट ना न चोजवे तें अक्षय सुख भोगुं ॥ गुंतुनि न पडों या भवजाळीं गुरुस्मरणीं लागुं ॥१॥
रुद्र जगद्रुरु तोही वंदित रघुविर कल्पतरू ॥ रुळति चतुर्विध मुक्ती पदिं तो भवजलनिधि उतरुं ॥
रुंझी करुनियां गुरुपदपद्मीं परिमळ तो स्वीकारुं ॥ रुचिकार गुरुनामामृत सेविनि हा निजरंग भरुं ॥२॥

पद ४.
निजानंद महाराज माझा परम गुरु स्वामी । जाईन लोटांगणीं पाहिन सर्वातर्यामीं ॥
न वर्णवे ते समाधि कृष्णा कुकुमती-संगमीं ॥ दयासिंधू पहूडला परात्पर निजधामीं ॥धृ०॥
निर्गुण परब्रह्म ध्यानीं मनी दिनरजनीं ॥ निरहंकृति निष्काकम आत्माराम चिद्भुवनीं ॥
नित्य निरामय विचरे विदेहत्वें जनीं वनीं ॥ नि:शब्द शब्दें विश्रामलें सत्य वचन वदनीं ॥१॥
जागृति स्वप्न सुषुप्ति अवस्था त्नय निरसुनि वोजा ॥ जाणिव नेणिव ग्रासुनि आला स्वभक्त निजकाजा ॥
जाळित रज तम वृत्ती ब्रह्मपुरिचा तो राजा ॥ जान्हविजळ मन निर्मळ तैसें जाणुनि नित्य भजा ॥२॥
नलिनीपत्र अलिप्त उदकीं होउनि उत्पन्न ॥ नरतनु पावुनी लीलाविग्रहि चित्सुख संपन्न ॥
नवविध भक्ती ह्रदयीं त्याच्या करिती कीर्तन ॥ नकळे महिमा शतपथ वदति तन्न तन्न ॥३॥
दशशत वदनें वदतां सद्नुरुगरिमा नि:शब्द ॥ दर्शनमात्नें विषयि मुमुक्षु भोगिति स्वानंद ॥
दंडुनि मनबुध्यादिक हरिले त्रिविध छेद भेद ॥ दंडप्राय प्रणमुनि पूर्ण रंगें अभेद ॥४॥

पद ५.
रंग रंग रंग ह्मणतां दोनिच हे वर्ण ॥ अघटित घटना माया पट दुरि करितिल संपूर्ण ॥
जग नग कार्या कारण निर्गुण निजात्म सूवर्ण ॥ पदोपदीं आद्यंतीं संतीं जाणावी खूण ॥धृ०॥
रंगविला निजरगें केला सार संसार ॥ रंका राज्य दिधलें सच्चित्‌सुखमय परांत्पर ॥
रंजवुनी बुध विबुधां स्वयें निज निर्विकार ॥ रम्य सुगम्य सुसेव्य निरंतर वाचे उच्चार ॥१॥
गंगा सागर मिळणीं सागर झालें सर्वांग ॥ गळीत झाल्या वृत्ती सर्व संगीं नि:संग ॥
गता यातातीत सदोदित अभंग ॥ गर्जुनि वेदश्रुति ह्मणती तो सहज पूर्ण रंग ॥२॥


References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP