मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह|
पदे ४०६ ते ४१०

पदसंग्रह - पदे ४०६ ते ४१०

रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.


पद  ४०६.
ये रंगा यावें दीनदयाळा देवकिबाळा रे ॥धृ०॥
भक्तवत्सला देवा ॥ गोकुळपाळा ॥१॥
वारुनी सकळ घंदा ॥ आनंदकंदा ॥२॥
विषम त्रासलों द्वंद्वा ॥ निजानंदा ये ॥३॥

पद  ४०७. [कळों आली माव रे या चा.]
भक्ती तैं विरक्ती रे विरक्ति तैं मुक्ती रे ॥ बंधाची निर्मुक्ती जीवा लाभे जैं सद्भक्ती रे ॥धृ०॥
आत्महिताकारणें विवेकें विचारणें ॥ सिंधुसी सैधव तैसी भक्ती अंगिकारणें ॥१॥
शुद्ध सांप्रदाय रे मुख्य हा उपाय रे ॥ हरी गुरुरूपें वारी सर्वहि अपाय रे ॥२॥
धैर्य मुख्य पाहिजे भक्तियोगें राहीजे ॥ निजानंद रंगीं अहंममत्वासी वाहिजे ॥३॥

पद ४०८. [चाल-मात:स्वामिनी सीता. राग कलंगडा.]
जीवा स्मरण करिसी ना कां नित्य शिवाचें ॥धृ०॥
मस्तकीं गंगा सुधाकर भाळीं ॥ भूतसमूह कृपें परिपाळी ॥१॥
नंदि वहन नृकपाल कराग्रीं ॥ भूषित सर्प विभूति शरीरीं ॥२॥
पंचवक्त्र विराजित सह अंबा ॥ सदय विलोकित भक्त कदंबा ॥३॥
स्थान स्मशान निरंजन ज्यातें ॥ इच्छित किंचि नास्ति तयातें ॥४॥
निर्गुण रूप सगुण जयाचें ॥ रंगी रंगलें शिवस्वरूप शिवाचें ॥५॥

पद ४०९.
तारी गुरुविना कोण भवाब्धि दुस्तर भारी रे ॥धृ०॥
शिव विरंचि रमापति हाचि ॥ दीन दयाकर मूर्ति सुखाची ॥१॥
शंभु शिवेसि गुरुगुज सांगे ॥ राम करी गुरुसेवन अंगें ॥२॥
व्यास ऋषी मुनि नारद धाता ॥ पावन परम गुरुपद ध्यातां ॥३॥
नाश तयासि लघुत्वचि साजे ॥ शाश्वत तेथें गुरुत्व विराजे ॥४॥
दु:ख लघुत्व अहं-मम-संगें ॥ सौख्य विलास गुरुपद रंगें ॥५॥

पद ४१०.
देवा गुज उमजेचिना कां दीनदयाळा ॥धृ०॥
तूं ह्रदयस्थ निरंतर जेथें ॥ मोहसमूह यथास्थित तेथें ॥१॥
एक मठीं तम दीपक राहे ॥ हें अघटित मतें गमताहें ॥२॥
वेदमुखें हरि बोलत गोष्टी ॥ नांदत जेविं हुताशन काष्ठीं ॥३॥
पाहे मथन करुनि विविकें तन्मय राहें रे ॥धृ०॥
तोय रवीकिरणावरि जैसें ॥ तेविं विवर्तरूपें जग भासे ॥४॥
शास्त्र गुरुसह प्रत्यय संगें ॥ वारीं अनित्य क्रीडे निजरंगें ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP