मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह|
पदे ४६१ ते ४६५

पदसंग्रह - पदे ४६१ ते ४६५

रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.


पद ४६१.
होतों कैसा मी ठकलों आपुल्या निजहिता मुकलों ॥ध्रु०॥
माझ्या स्वरूपाचा अंत पाहातां कुंठित वेदांत ॥ ऐसा व्यापक मी असतां तो मीं ह्मणवी औट हात ॥१॥
निजानंद-पद अविनाशी पाहाहो त्यजिलें म्यां यासी ॥ टाकुनि मणि घे कांचवटी तैसा रमलों विषयांशीं ॥२॥
नवल श्रीगुरुची करणी चिद्रुप प्रकाशला तरणी ॥ द्वैत नासुनियां तम ते भरली निजरगें भरणी ॥३॥

पद ४६२.
आहा रे केवढा हा गोता प्राणी खातसे कळतां ॥ एकामागें एकाच्या कशा पड्ताती चळथा ॥ध्रु०॥
शब्दें वेधुनि मृग धांवें स्पर्शें गज बंधन पावे ॥ रूपें पतंग नाडियला रसना गोवित गळ गोवीं ॥१॥
भ्रमर सुगंध कमळांत आसक्ति धरुनियां तेथ ॥ गुंफुनि राहातां तो हस्ती रात्रीं येउनि भक्षीत ॥२॥
पांचहि विषयें पांचांसी नाश केला जिवितेंसीं ॥ मोहें पांचहि ज्यामध्यें त्याची गति होइल कैसी ॥३॥
धरितो शुक नळिका पायीं मुक्त असतां नव जाय ॥ तैसें मीपण हें गोवी कोशकीटकाच्या न्यायें ॥४॥
आंवरुनि पांचहि विषयांसीं लाविला सद्नुरुभजनासी ॥ ऐसं करील जरि तरि हा पावे निजसुख रंगासी ॥५॥

पद ४६३.
सद्नुरुभजनीं लावा रे ॥ करणें निजसुख सेवा रे ॥ लक्ष चौर्‍याऐसीं योनी उगवा प्रपंच गोवा रे ॥ध्रु०॥
शब्दीं गुरुच्या रति ठेवा चरणस्पर्शें तनु रावा ॥ निजरुप पाहुनियां डोळां गुरुच्या तीर्थरसा सेवा ॥१॥
सुंगध गुरुपदकमळीं ध्या रे; ऐशा पांचाचा ॥ झाडा करुनि; विवरा रे; पट येइल त्रिभुवनिंचा ॥२॥
शत्रु मित्र आप-आपणा मन हें मुरडे तरि जाणा ॥ मग निज वस्तुचा दानीं भेटे श्रीरंग गुरुराणा ॥३॥

पद ४६४.
र्सहजचि निर्भय ते ज्ञानी ॥ध्रु०॥
नामरूप नैश्वर हा प्रत्यय ॥ उरलें तें शाश्वत अज अव्यय ॥१॥
अस्ति भाति प्रिय स्वगत भेद ॥ त्रिपुटिरहित हरि गर्जति वेद ॥२॥
मायिक लहरी ओघ तरंग ॥ उदधी मात्न शाश्वत निजरग ॥३॥

पद ४६५.
हो कां भलतेसे परि तें ॥ लागों भक्तिरसें ॥ध्रु०॥
फळ जळ मूळ हो ॥ उणें केवळ हो किंबहुना एक तुळसीदल हो ॥१॥
यातिहीन पशुपक्षीकुळ हो ॥ कुस्थळ स्थळ परी मन प्रेमळ हो ॥२॥
कारण मुक्तिसि भक्ति प्रधान ॥ निज रंगें होय पूर्ण समाधान ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP