मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह|
पंचक

पदसंग्रह - पंचक

रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.


[पृथ्वी, गण ज, स, ज, स, य, ल, ग.]

असेल जरि पूजिला विपुल हस्तकें श्रीहरी ॥ नसेल जरि योजिले विषम भाव सर्वांतरीं ॥
करूनि विहितें बरीं समुळ अर्पिलीं ईश्वरीं ॥ तरीच गुरुकेसरी भवगजासि नाहीं करी ॥१॥
भहेश महदादिकीं वसत एक भेदेविना ॥ अशीच जरि भावना सतत वर्तली जैं मना ॥
दया सकल भूतर्कीं विशक जन्मजन्मांतरीं ॥ तरीच गुरु० ॥२॥
अनाथपद वागवी स्मरण सर्वदां जागवी ॥ विशाद मद मोह हा समुळ चित्तिंचा त्यागवी ॥
सदां विदुषसंगतीं निज हिताप्रती जैं धरी ॥ तरीच गुरु० ॥३॥
जगासि जनका असे विमल लक्षणीं लक्षिलें ॥ सकांक्षवत सक्रिये परम आदरें रक्षिलें ॥
निशापति दशा वसे विगत संशयो अंतरीं ॥ तरीच गुरु० ॥४॥
आनंदगिरिशीखरीं मन मयूर नाचे सदां ॥ दिवा निशिहि नाठवे अणिक संपदा आपदा ॥
निजानुभव रंगला विशद बोध अर्कापरी ॥ तरीच० ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP