मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह|
पदे २३१ ते २३५

पदसंग्रह - पदे २३१ ते २३५

रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.


पद २३१.
भली भली वोगरती पूर्वपुण्यें तूं सरती पुरती ॥धृ०॥
ब्रह्मसंपन्न सद्वत्ति लक्षणोक्त ॥ प्रवृत्ति निवृत्ति निरसूनि जिवन्मुक्त ॥
तीतें प्रज्ञा पुसे होउनियां विरक्त ॥ म्हणे एकचि कैसें मानिसी अव्यक्त ॥१॥
दुस्तरतर हा दुर्निवार प्रपंच पाहीं ॥ क्षण एकासारिखें एक नाहीं ॥
परि तुज प्रपंचीं परमार्थ सर्वदांही ॥ अभेदबुद्धि नेणवे मज हे कांहीं ॥२॥
सांग वो सखिये यांचे कैसें वर्म कर्म ॥ कैसेंएक रूप जाणसी धर्माधर्म ॥धृ०॥
अभेदबुद्धि बाळा प्रत्यत्तर अनुवादे ॥ सर्व भूतिं परमात्मा एकचि नांदे ॥
जग नग कार्या चित्सुवर्ण कारण वो दे ॥ आदिमध्यांतीं परमार्थ पूर्ण कोंदे ॥३॥
सर सर वो अरजे अद्वैतीं द्वैत कैंचें काय ॥ भासे. जग हें परि मिथ्या मृगजळ-न्याय ॥धु०॥
स्थाणु पुरुष रज्जूवरि भुजंगभान ॥ रजतशुक्तिके विवर्त उपादान ॥
तैसा प्रपंच स्वरूपीं जाणति सज्ञान ॥ दिसे भासे तें सच्चिदानंदघन ॥४॥
शर्करा गोडी विवडितां झाली प्रज्ञा वेडी ॥ हो कां भासे प्रपंच कडोविकडीं ॥धृ०॥
कटु आम्ल मधुर इंद्रावन लींबें केळें ॥ शर्करा पय सर्पी निमुनियां प्रज्ञा कुशळें ॥
सेवूं जातां मधुरता एके काळें ॥ तैसा प्रपंचीं परमार्थ अहळें बहळे ॥५॥
अनुभवें अनुभव जाणति विद्वज्जन विजन-विहारी ॥ तरोनि तारक दिक्षाग्रहणें जगदुद्धारी ॥धृ०॥
नि:संदेह प्रश्नोत्तरश्रवणें सहज ॥ पूर्ण सिद्धी पावले हे निजकाज ॥
ऐक्य झालें हें म्हणतां वाटे चोज ॥ मुळींच द्वैताद्वैत नेणती ते गुरुराज ॥६॥
सहज पूर्ण निजानंदें रंगले साधुसंत ॥ ज्यांचा ब्रह्मादिक नेणती आदि-अंत ॥धृ०॥

पद २३२.
रामीं रंगली वृत्ती कामीं न फिरे रे ॥
प्रवाहे सिंधुगामी न वाहे पुनरागामी ब्रह्मगिरी रे ॥धृ०॥
आत्मा अखंड जो स्वत:सिद्ध ॥ उपाधियोगें शुक-नलिका प्रतिबद्ध ॥
नाहीं द्वैतासि ठाव ॥ झाली कल्पना वाव ॥ सोहं निर्धारें रे ॥१॥
वृक्षापासुनि सुटलें फळ ॥ तें काय शोधी जाउनि आपुलें पूर्व मूळ ॥
चित्‌ चैतन्य रूप ॥ तद्रुप आपें आला ॥ झालें न फिरे रे ॥२॥
अहं सोहं हें भेदभाग ॥ गिळुनियां जाळा अवघा निजानंदघन ॥
श्रींरग शुद्ध बुद्ध ॥ श्रुति विवाद स्तब्ध ॥ म्हणती नेती नेती ॥३॥

पद २३३.
आम्ही धन्य धन्य धन्य ॥ झालों बाई वो ॥धृ०॥
ठेवुनि मस्तकीं ह्स्त ॥ देउनियां निज वस्त ॥
येणें जाणें वेळों वेळां नाहीं वो ॥१॥
तंतुवरी जैसा पट ॥ मृत्तिकेचा तैसा घट ॥
आह्मांवरी द्दश्य तदंन्याय वो ॥२॥
निजानंदीं खेळों खेळ ॥ रंगीं रंगों सर्व काळ ॥
वर्णिती जयासि चारि साहि वो ॥३॥

पद २३४. (अभंग)
माझिया कपाळें केलें केलें शक्तीहीन ॥ ऐसें तों दिसोन आलें देवा ॥धृ०॥
ऐकत होतों तुझ्या पायांचा प्रताप ॥ तो आतां आटोप कळों आला ॥१॥
लोहाचे मांदुसेमाजीं परिस वसे ॥ कर्पूर कोळसेपणीं राहे ॥२॥
तैसें तुझे दास म्हणवितों तोंडें ॥ तरी येवढें थोडें म्हणुं नये ॥३॥
अनंता जन्मींचा बैसलासे मळ ॥ क्षणार्धें निर्मळ होय कैसा ॥४॥
तव्याचा दर्पण होताहे सोज्वळ ॥ जैं क्लेश प्रांजळ होती तेव्हां ॥५॥
काया वाचा मनें दास म्हणवणें ॥ हें तुझें करणें तुझ्या हातीं ॥६॥
तुझें म्हणोनियां राहिलों निराळा ॥ हे लज्जा गोपाळा धरीं मनीं ॥७॥
दीनाचा साहाकारी सत्य होईल बोल ॥ योग सिद्धी न्याल माझा जेव्हां ॥८॥
सर्व रंगीं एक निजानंद झाला ॥ ऐसें हें विठ्ठला करीं वेगीं ॥९॥

पद २३५.
श्रीगुरूवर्या रे निज चित्सूर्या ॥ अचळ अढळ तव कीर्ति अनुपम नेणति शतपथ चर्या ॥धृ०॥
द्वैततमारी रे जड जीव तारीं ॥ मस्तकीं हस्त ठेउनियां भवनिधि-जळीं तूंचि उतारी ॥१॥
अखिल अमुपा रे चिन्मयरूपा ॥ शरणागत दीनतारण वारण जनन मरण भव-खेपा ॥२॥
प्रभु नि:संगा रे अनंग अंगा ॥ सहज पूर्ण निजमूर्ति निरामय अक्रिय अभंग रंगा ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP