मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह|
पदे ३५१ ते ३५५

पदसंग्रह - पदे ३५१ ते ३५५

रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.


पद ३५१. (अभंग)
मृत्तिकेचा घट पाहीं ॥ मृत्तिकेसी ठावा नाहीं ॥१॥
तैसें जाणा विश्व झालें ॥ बोलीं काय आन आलें ॥२॥
चित्रपटाचें कौतुक ॥ तंतु अद्वय अक्रिय एक ॥३॥
हेमीं झाले अळंकार ॥ हा तो वाउगा विचार ॥४॥
देश काळ परिच्छेद ॥ हा तो कल्पनेचा भेद ॥५॥
सिंधू लहरी तरंग ॥ तैसा निजानंद रंग ॥६॥

पद ३५२. (अभंग)
स्नानें पानें दोष जाय ॥ गंगा श्लध्य मानी काय ॥१॥
तैसें करवीं बा कीर्तन ॥ वारुनि अविधीचें वर्तन ॥२॥
अंधारेसी रात्री जावी ॥ दिनकर चोज काय भावी ॥३॥
माझे छाये निवती जीव ॥ तरु मानीना वैभव ॥४॥
अथवा संत संगें कैसा ॥ पूर्णिमेचा सिंधु जैसा ॥५॥
ना तरि आर्त पाहुनि डोळां ॥ दावी मायेहुनि कळवळा ॥६॥
न जडे जाणिवेचा लेश ॥ मिथ्या मानी बाह्म वेष ॥७॥
इच्छा द्वेष मारुनि द्वंद्वें ॥ नाचे रंगीं निजानंदें ॥८॥

पद ३५३. (अभंग)
शास्त्र व्युप्तत्तीचा भाव ॥ हाचि काय तरणोपाय ॥१॥
व्हावी अंतरीं विश्रांति ॥ जावी मोह ममता भ्रांति ॥
माझीं गद्य-पद्यं ॥ हा तों केवळ मायिक पंथ ॥३॥
नित्य पूर्ण तो अभंग ॥ निजानंदें भरला रंग ॥४॥

पद ३५४. (अभंग)
आम्हां दुर्बळांच्या डोळां ॥ कैंचा अद्वैत सोहळा ॥१॥
दिधलें गुरुराजें दयाळें ॥ नाहीं व्युप्तत्तीच्या बळें ॥२॥
हेचि जाणा पराकष्ठा ॥ धरा सद्नुरुपायीं निष्ठा ॥३॥
रंगीं निजानंद सेवा ॥ सायुज्यांही वरील ठेवा ॥४॥

पद ३५५. (अभंग)
दैवें आलों तुझिया पोटा ॥ झालों बह्मांडाहुनि मोठा ॥१॥
तुझा उपकार काय वानूं ॥ माझा डोळस तूं चिद्भनू ॥२॥
माया मोहाचें कारागृह ॥ केलें तोडुनि चिद्रुप देह ॥३॥
निजानंद नित्य नि:संग ॥ कृपें केला अभंग रंग ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP