मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह|
पंचक

पदसंग्रह - पंचक

रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.


[भजंगप्रथात, गण य, य, य, य.]

अती वैभवें वर्ततांही न तोषे ॥ तया नाश होतां कदापी न रोषे ॥
न मानूनि दोन्ही स्वलीलें निवाला ॥ असा मक्त तो नित्य वदू तयाला ॥१॥
वपू होरिपू मदिरीं बंदिशाळे ॥ पडे ते जरी जाण प्राचीन मेलें ॥
नसे बुद्धि वैषम्य कांहीं जयाला ॥ असा० ॥२॥
तनू तापली क्लेश रोगादि तापें ॥ ह्मणे पूर्व प्राचीन भोगानुरूपें ॥
न वाहेवि शोका सुखाब्धींत ठेला ॥ असा० ॥३॥
करी सांग कर्मे अकर्तात्मबोधें ॥ वसे निर्मयें पूर्वकर्मावरोधें ॥
विविकेंचि सारांश मार्गें निघाला ॥ असा मुक्त० ॥४॥
निजानंद रगेचि रंगूनि पाहीं ॥ घटीं बिंब अलिस तो तेंवि देहीं ॥
विवेकीं महाराज निर्मुक्त झाला ॥ असा मुक्त० ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP