पदसंग्रह - पंचक
रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.
[भुजगप्रयात गण य, य, य, य.]
आसक्ती नको पुत्रदारादिकांची ॥ आसक्ती नको इंद्रिरामंदिरांची ॥
आसक्ती नको सांडी देहादि लोभा ॥ मरीची जळाची दिसे सर्व शोभा ॥१॥
विषें रांविलीं तीं जशीं उत्तमान्नें ॥ न ये सेविता जेंवि पैं तीं अमान्यें ॥
तयाचेपरी मानिसी काय लाभा ॥ मरीची० ॥२॥
अशी जाणतां लक्षिसी कां परीक्षा ॥ करी जाण सर्वात्मभावें उंपक्षा ॥
वृथा देह गेला भजे पद्मनाभा ॥ चरीची० ॥३॥
मदें भूललासी वृथा केविं सागे ॥ वदे अट्टहांस गुरुनाम वेगें ॥
धरी लीनता सांडिं रे कान क्षोभा ॥ मरीची० ॥४॥
नसे सौख्य कांहीं कदां कामसंगें ॥ निजानंद पायीं सदाकाळ रगे ॥
धरीं पूर्ण वैराग्य सांडूनि दंभा ॥ मरीची जळा० ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP