मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह|
पदे ६३१ ते ६३५

पदसंग्रह - पदे ६३१ ते ६३५

रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.


पद ६३१.
गोकुळ हें आमुचें गोपाळें रक्षिलें ॥ध्रु०॥
भयकृद्भयनाशक दावाग्नीप्राशनकर्ता ॥ अभक्त निंदक दुर्जय दानवकुळ-संहर्ता ॥
कैठभारि हा गोवर्यनगिरिधर्ता ॥ ब्रह्मादिकही नेणति याची वार्ता ॥१॥
गोवळवत्सें त्या विरंचीनें नेलीं ॥ तेव्हां त्यांसारिखीं नूतन केलीं ॥
ऐक्यभावें समसाम्यें समरस झालीं ॥ नकळे कवणाचीं हीं आलीं गेलीं ॥२॥
परात्परतरवर निर्गुण निर्विकारी ॥ उतरी नरनारी परपारीं पूतनारी ॥
यमुनातीरविहारी गोवळडत्सें चारीं ॥ वाजवुनि मोहरी मन मोहरी हा मुरारी ॥३॥
नंदनंदन कंसनिकंदन हा ह्रषिकेशी ॥ पूर्ण ब्रह्म अवतरला यादववंशी ॥
हा निजभक्तकामकल्पद्रुम चिद्विलासी ॥ निजानंद रंगला ह्रदयनिवासी ॥४॥

पद ६३२.
तड तड तड तोडुनि टाकी ॥ तड तड तड तोडुनि टाकी ॥ध्रु०॥
माया-मैंदिणीचा गळफांस न तुटे ब्रह्मादिकीं ॥१॥
आशापाशीं गुंतलेंसी व्यसनीं पडली नाकीं ॥२॥
निजरंगें रंगें तूं सावध होईं नेत्र न झांकीं ॥३॥

पद ६३३.
अउले माझे कृष्णाबाई तूं येईं गे ॥ध्रु०॥
पूर्ण ब्रह्म परात्परे निर्विकारे निराकारे ॥ अजरे अमरे निगमागमसारे ॥१॥
कमळलोचने कमळाकरे जगदुद्धारे विश्वंभरे ॥ दामोदरे गुणगमीरे गे ॥२॥
सुंदरे श्रीवरे ॥ निर्विचारे सर्वाधारे ॥ सुरवरवरदे इदिरावरे गे ॥३॥
नंदकुमारे कुंजविहारे परम उदारे मनोहरे ॥ सुकुमारे पूर्णावतारे गे ॥४॥
निर्गुण नि:संगे सहज पूर्ण अभंगें ॥ निजानंद शाश्वत रंगे गे ॥५॥

पद ६३४. [आत्यास्वामीकृत]
कामाचे मजूर आपपर जाणे काय रे ॥ध्रु०॥
किती माथां घेईल वोझें किती ह्मणेल माझें माझें ॥ विषयविलासी झाले कैंचा बाप कैंची माय रे ॥१॥
कामीं नाहीं उसंत रे क्षणभरी नव्हे संत रे ॥ हरिगुरुभजनेंविण निरर्थक दुर्लभ नरतनु जाय रे ॥२॥
पश्वात्ताप कांहीं रे स्वप्नीं तिळभरि नाहीं रे ॥ पूर्ण रगें रंगावें हा नेणे अभिप्राय रे ॥३॥

पद ६३५.
श्रीगुरु स्वामी सर्वस्वेंशीं अपराधी मी ॥ध्रु०॥
तुजशीं विमुख होउनियां सुख विषयांचिया गुणग्रामीं ॥ सेवुनि आपला आपण वैरी झालों गुंतुनि कांमीं ॥१॥
दु:खमूळ आघती तें सुख सेवुनि म्हणवी पराक्रमी ॥ विषवत्‌ विषय पीयूषवत्‌ मानुनी इच्छित फंळ परिणामीं ॥२॥
शरण आल्या लोहस्पर्शमणी तें शोभे हेम ललामीं ॥ निजरंगें रंगावें तैसें सबाह्म-अंर्तयामीं ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP