मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह|
पदे २७६ ते २८०

पदसंग्रह - पदे २७६ ते २८०

रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.


पद २७६. (चाल-सदर.)
स्मर रे रघुवीर हे मानस ॥धृ०॥
देह अशाश्वत जाईल हा रे ॥ अतिसत्वर निजहित पाहा रे ॥१॥
ब्रह्मार्पण सत्कर्में आचरें ॥ भक्ति विरक्ति विवेक विचारें ॥२॥
झांकुनि नेत्र दिवानिशि किरसी ॥ हरिपदीं रंग भवार्णव तरसी ॥३॥

पद २७७. (चा. सदर)
गुरु गारुडिया रे नेईं ॥ अनिष्ट विलयारे नेईं ॥धृ०॥
भव भयानक दुर्जय सर्पें ॥ भूलविलें मज दंशुनि दर्पें ॥१॥
वीष पियूष पीयूष हलाहल ॥ शीत गमे वडवानल केवळ ॥२॥
सत्वजळें निर्विष करिं मातें ॥ वारुनि स्रेह निवारीं तमातें ॥३॥
प्रकृतिचा पल्लव न लागावा ॥ जागरणीं हरि जागर गावा ॥४॥
निस्तरंग निर्मंदर सिंधू ॥ तोचि रंग रंगवी दिनबंधु ॥५॥

पद २७८. (चा. सदर)
शेजे कैं निज येईल गे ॥धृ०॥
नामरूप गुण मीपणसंगें ॥ विविध न होईल गे ॥१॥
स्वगत सजाति-विजातिय-भेदें ॥ मेळुनि नेईल गे ॥२॥
देश काल आणि वस्तु विचारि ॥ एकचि होईल गे ॥३॥
सोहंभाव त्रिपुटिविवर्जित ॥ प्रत्यय येईल गे ॥४॥
नाना रंग विचित्न विनोदीं ॥ निजसुख देईल गे ॥५॥
निजरंगीं या रंग विचित्रें, ॥६॥

पद २७९. (चा. सदर)
मी माझें विसरें सहजें ॥ अद्वय एक सरें ॥धृ०॥
दु:खित जीव भ्रमें भ्रमतां ॥ कारण यासि अहंममता ॥१॥
देहबुद्धि केवळ विषव्याळी ॥ विषलहरें भुवनत्नय जाळी ॥२॥
याचि लागिं श्रुतिस्मृति संग्रहणें ॥ सह करणें मानस निग्रहणें ॥३॥
हाचि मंत्न सनकादिक गाती ॥ भाविक ह्रत्कमळिं हरि ध्याती ॥४॥
विद्वज्जन ह्रद्रत हा भाव ॥ सहज पूर्ण निजरंग स्वभाव ॥५॥

पद २८०.
सखया रे काय जाहालें ॥ तुज तम कां आलें ॥धृ०॥
भूलले जन नावरे मन आठवि धन स्वजन यौवन ॥ जाणे तो एकाकिं न चुके ॥१॥
स्वहिताचि मात कायसी ॥ गति गमली कैसी ॥ जीव सर्वहि नर नरेंद्रहि ॥
ऋषी मुनिंद्र इंद्र चंद्रहि ॥ काळानळ जाळिल हें न चुके ॥२॥
निजसुरा काय जागें ॥ हरि भजनीं लागें ॥ व्यर्थ श्रम रे कां विषम रे ॥
सांडिं भ्रम रे स्वहितीं रम रे ॥ रंगें निजानंदचरणीं ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP