पदसंग्रह - पंचक
रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.
[वसंततिलका छंद.]
अद्यापि तें विष शिवें धरिलें स्वकंठीं ॥ कूर्में महीसि धरिलें अझुनी स्वपृष्टीं ॥
अबोनिधींत वडवानळ आदि अंतीं ॥ अंगीकृत: सुकृतिन: परिपालयंती ॥१॥
भासे सदैव शशि वक्र सदां कलंकी ॥ हा दोष तों प्रकट सत्य असे त्निलोकीं ॥
भाळीं अनन्य शरणागत सद्नुरूसी ॥ आले पतीत जन केवळ हीन दोषी ॥
केले महा परम पावन साधु संतीं ॥ अंगीकृत: सु० ॥३॥
मी एक त्याहुनि विशेष अशेष पापी ॥ जाणोनिही न परतें स्वहितीं कदापी ॥
आलों तुला परण सोडुनि सर्व गुतीं ॥ अंगीकृत: ध० ॥४॥
सच्चित्सुखिक-घन तूं निजमूर्ति रामा ॥ नि:संग रंग पुरुषोत्तम पूर्णकामा ॥
देईं अतां मज तुझी अविनाश शांति ॥ अंगीकृत० ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP