पदसंग्रह - अष्टक ४
रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.
[भुजंगप्रयात. गण य, य, य, य.]
मुखें बोलती सत्य बिद्धांत गोष्टी ॥ चंढे वोहटें शोक संताप पोटीं ॥
अघातीं जयाचें समाधान वेंचे ॥ वृथा बोल ते फोल जाणा तयाचे ॥१॥
दिठीं देखतां योषित काम नाडी ॥ नसे शांति देहीं सदां क्रोध ताडीं ॥
मदें व्यापिलें चित्त जाणा जयाचें ॥ वृथा० ॥२॥
सुकाचे परी बोलणें सर्व जाणें ॥ जनातें ठकायासि दावी प्रमाणें ॥
मना आवडे आदरीं तेंचि साचें ॥ वृथा० ॥३॥
वदे भाग्य वैराग्य याहूनि नाहीं ॥ निरापेक्षता नातळे चित्त कांहीं ॥
अति श्लाध्य मानी शरीरेंद्रियांचें ॥ वृथा० ॥४॥
मुखें बोल बोलोनि दावी प्रतापें ॥ शरीरासि आद्यतं येतांचि कांपे ॥
मनी दोष वहि सदां सज्जनांचे ॥ वृथा० ॥५॥
समर्थासनीं बैसतां सौख्य वाटे ॥ नसे मान तेथें अती दु:ख दाटे ॥
वसे सर्वदां पैं अहंकार वाचें ॥ वृथा० ॥६॥
उदासीन नाहीं सदां दैन्यवाणा ॥ कदां बोलतो ना वदे सत्य जाणा ॥
सुखाचेनि संतोष मानूनि नाचे ॥ वृथ० ॥७॥
नसे बाणली इंद्रियांलागिं शांती ॥ नसे या मनें या मनें सांडिली द्दश्य भ्रांसी ॥
तदानंतरे सौख्य मानी जिवाचें ॥ वृथ० ॥८॥
स्वदोषांसि पाहूनियां पैं न लाजे ॥ स्वकर्मीं सदां मंद वांयाचि साजे ॥
स्मरेना विजानंद रामासि वाचे ॥ वृथा ॥९॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP