मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह|
पंचक

पदसंग्रह - पंचक

रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.


[द्रुतविलबित गण न, भ, भ, र.]

जगतिनाथ जगीं कवणें रिती ॥ वसत हें जन निश्वत नेणती ॥
धरुनि मीपण वतति पामरें ॥ गमत कोण कळे न कळे पुरें ॥१॥
श्रवण ऐकति नेत्र विलोकिती ॥ निवडिते रसना रसव्युत्पत्ती ॥
धरिति हाचि सुनिश्वय आदरें ॥ गमत कोण० ॥२॥
शरिर यौवन संपत्ती सोयरे ॥ रवकिय देश विदेश वनांतरें ॥
निगम शास्त्र पुराण चराचरें ॥ गमत० ॥३॥
न कळणें कळणें विविधा खुणा ॥ वळखणें द्दढ सांडुनि मीपणा ॥
त्यजुनि हे भजती कुमतांतरें ॥ गमत० ॥४॥
हरिहरादिक या सुखसगती ॥ जळ जळीं गत तद्वत रंगती ॥
भ्रमभरें श्रमती नर वानरें ॥ गमत० ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP