मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह|
श्लोकपंचक

पदसंग्रह - श्लोकपंचक

रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.


[शार्दूलविक्रीडित वृत्त, गण म, स, ज, स, त, त, ग.]

सत्कर्में न करी हरीसिन धरी जो अतरीं सर्वदां ॥ सारासार विवेक शून्य करुनी सेवीतसे दुर्मदा ॥
संसारीं रत होउनी विचरतो आली जरी हे जरा ॥ तो जाणा नर बैल मानवरुपें होडा दुपायीं खरा ॥१॥
ये लोकीं नरदेह दुर्लभ असा पावोनियां मूढ रे ॥ सत्संगीं न वसे आसक्त विषयों दुर्वासना द्दढ रे ॥
कांता कांचन पुत्र मित्र सुह्रदें त्यांकारणें घाबरा ॥ तो जाणा नर ॥२॥
वेदांच्या वचनीं पुराणश्रवणीं सद्भक्ति नाहीं मनीं ॥ स्वप्नींहिं नमनीं कृतर्क धरुनी निंदा करी सज्जनीं ॥
ऐसा पामर भूलला निशिदिनीं जो गुंतला दुर्भरा ॥ तो जाणा नर० ॥३॥
दु:खें दुर्जय भोगिलीं बहु परी जी जन्मजन्मांतरीं ॥ नाना दुर्वट यातना यमपुरीं ज्या सोशिल्या अंतरीं ॥
त्यांची लाज नसे निरंतर असे उन्मत्त प्राणी बरा ॥ तो जाणा नर० ॥४॥
जो कृष्णार्पण सत्क्रिया न करितां कर्मीं अहंता धरी ॥ भोंगी दुष्कृतिचीं फळें मग रडे घेवोनि वोझें शिरीं ॥
रंगेना निजरंग पूर्ण ह्रदयीं जो न स्मरे ईश्वरा ॥ तो जाणा नर० ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP