मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह|
पंचक

पदसंग्रह - पंचक

रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.


[भुजंगप्रयात गण य, य, य, य.]

कुसंगें बहू शीण चित्तासि झाला ॥ कुमार्गांतरें त्रास हा थोर आला ॥
कुमार्गीं सदाचार लोटूनिज देती ॥ कुतर्कें अतर्क्यीं मृषा लाविताती ॥१॥
कुयोगी कुबुद्धी कुशास्त्राधिकारी ॥ बळें नाथिलें स्थापिती ते विकारी ॥
पुढें भाविकें भावनेतेंचि जाती ॥ कुतर्के० ॥२॥
वदे एक चक्षूसि लक्षूसि लक्षूनि पाहा ॥ वदे एक तो नाद ब्रह्मींच राहा ॥
वदे एक तो मोक्ष पैं देहपातीं ॥ कुतर्कें० ॥३॥
वदे एक तो बुद्धि बोधरवरूपीं ॥ दुजा मोक्ष कैंचा जिवातें निरूपी ॥
नसे निश्वयो एकही आदि अतीं ॥ कुतर्कें० ॥४॥
समस्तांसि जो बुद्धिदाता अभेदें ॥ नुरे मीपणें सच्चिदानंदबोधें ॥
न रंगोनियां या सुखें मूर्ख जाती ॥ कुतर्तें अतर्कीं मृषा लाविताती ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP