मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|
श्रीज्ञानेश्वरमहाराजांचे अप्रसिद्ध पद

श्रीज्ञानेश्वरमहाराजांचे अप्रसिद्ध पद

इ. स. १९४२-४४ च्या सुमारास या भजनात भाव घेणारा एक भजनकरी ‘ बोधाच्या मदनात ’ हे ज्ञानेश्वरमहाराजांचे पद म्हणत असे.

बोधाच्या मदनात सखे ग बाई मी झाले वेडी । चित्तचांदण्यामध्ये सखे ग बाई घातली पलंगडी ॥धृ०॥
वैराग्याची पानसुपारी भरोनी तबकडी । विवेकाचा चुना लावुनी बनविली विडी ॥ तम - तमाखु जाळायाला जवळ गुरु - गुडी । सत्रावीचे पाणी भरूनी आणिले त्याच घडी । तर्‍हतर्‍हेचे रंग मी करते साधन बहुरंगी । परपुरुष भोगिला परंतु दोष नाही अंगी ॥१॥
क्रोध माझा भ्रतार याका ठेवोनिया घरी । मला लागली गोडी म्हणुनि हिंडते परद्वारी । आशा माझी सासू इजला करूनी आले चोरी । मनषा माझी नणंद आहे राखण मजवरी । लोभ दंभ अहंकार दीर नलगे संसारी । अहंकार हा सासरा माझा पूर्वीचा वैरी । इतक्यांना मी कर जोडूनी लागेन दुजे अंगी ॥२॥
भावासंगे बाई मी नेले केवढी काळीज । द्वैतभावहे ओल सखे ग बाई मला नाही लाज । चतुर्दळावरी षट्दळ दश हे दळावरी आज । द्वादश षोडश दळ वरती द्विदळाची मौज । इडा पिंगला तिसरी सुषुम्ना पुण्या गेली बीज । त्रिवेणीचा संगम तेथे चिन्मयाचे राज्य । उन्मनीच्या द्वारी अनुहत वाजविली पुंगी ॥३॥
सहस्रदळावरी दसवे द्वार वोलांडोनी । भक्ती माझी कुंटीण इने दावियले नयनी । सोहं मूर्तीच्या बंगल्यावरती निद्रागत बहिणी । ओहं सोहं सेवा करिती मोठ्या हौसेनी । दिव्य ज्योत सुप्रकाशे जळताती दोनी । प्राणसखा सोयरा उभा का तेथे आंगणी । भक्तराज ज्ञानोबा तयाचे नाव अभंगी ॥४॥
( के. वा. आपटे, म. स. प - ३०.३ )

N/A

Last Updated : December 26, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP