दासोपंत ओंव्या
' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना.
त्या काळीं पादशा आपण । पुसतसे त्या मनुष्यालागून ॥
‘अरे तूं कोठील ? कोण ? । कोणीं तुजला धाडिलें ? ॥१॥
येरू म्हणे दिगंबराच सेवक । जाणून आम्हास फार विशासुक ॥
हुंडया देऊन आमुचे हस्तक । पाठविला असे सर्वस्व ॥२॥
पादशा म्हणे, ‘तूं चाकर । किती दिवसांचा निर्धार ॥
आणि नामही सत्वर । सांग आतां या काळीं.’ ॥३॥
‘नाम तों दत्ताजी जाण । चाकर सप्त पिढयांपासून ’।
मुशारा पुसतां पूर्णं । बोले, “अन्नार्थी मी असें’ ॥४॥
त्यांनी मजला टाकून । कदापि न राहती एक क्षण ॥
जागृती सुषुप्ती आणि स्वप्न । त्यांचे सन्निध मी असें ॥५॥
आपुला जो बाकी पैका । त्याच्या हुंडया असे देखा ॥
हे दर्शनी हुंडया अति चोखा । यांस उधार नसेची ॥६॥
हुंडयाचा विश्वास नसे तुम्हासी । तरी द्रव्य रोकडें असे मजपाशीं ॥
तें देईन संपूर्णं निश्चयेंसी । घ्यावें आतां या काळीं ॥७॥
N/A
References : N/A
Last Updated : April 05, 2015
TOP