मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|
शिव कल्याण

शिव कल्याण

' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना.


तो मातापुरप्रदेशीं । प्रकट कैवल्याची राशी ।
तेथें बहुतां मुमुक्षांसी । पावनता जोडे ॥

ते गोडी मियां लाधोनं । विसरोन गेलें देहभान ।
पिता होत्साता जाण । गुरुवर्य कीं ॥

गोदातीर उत्तरभाग । देवगिरि नगर सुभग ।
धारागिरिपर्वतेंसी योग । जया नगरासी ॥
तेथें याज्ञवल्कि श्रीमंत । श्रीगोपाळ श्रीकृष्णसुत ।
तपोयोगाचें अधिभूत । ज्ञानाधिष्टान ॥
तयाचें सांगेन गुरुकुळ । तरी यति अच्युतागम मूळ ।
म्हणोन योगज्ञानें विशाळ । वेदसारभुक्त ॥
तयाची गोडी फळा आली । म्हणोनि विवरणा हांव जाली ।
नाना ते हांव सामावली । विवरणीं इये ॥
असो तेणें मनोरथ केला । तो स्वामी माझेनि स्वीकारिला ।
स्वीकारूनि उलंडिला । हृदभुवनीं माझां ॥

म्हणोनि पूर्वीं वाखाणिलें । दुसरेन पात्रारूड केलें ।
गाथा शब्दीं आथिलें । संक्षेपेंसी ॥

सदगुरुं परमानंद वंदे आनंदविग्रहं ।
यस्य सन्निधिमात्रेण चिदानंदायते तनु: ॥
नित्यानंदाय गुरवे शिष्यसंसारहारिणे ।
भक्तकायैंक देहाय नमस्ते चित्सदात्मने ।
यस्यादर्शनमान्नतोखिलमिदं विश्वंसमा भासते ।
यज्ज्ञानेन विलीयते मृदि यथा कुंभादयस्तन्मया: ॥
एवं नित्यमनित्य वाग्निलसितं दूरंतरंगादिवत ।
नित्यानंदमहं भजामि सततं स्वानंदपूर्ण परम ॥

नीलोल्पलदलश्यामं पद्मपत्र निभेक्षणं ।
घ्यायेच्छ्रीविठ्ठलं नित्यं जघनस्थ करद्वयम ॥

N/A

References : N/A
Last Updated : April 05, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP