मुक्तेश्वरांची कविता
' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना.
पुत्रनिधन पडतां श्रवणीं । हा हा शब्द करूनि वदनीं ।
प्रज्ञाचक्षु पडला धरणी । हृदय हस्तें पिटीत ॥
म्हणे ‘प्रिय प्राणापरता । पांडु माझा सहोदरभ्राता ।
आजि निमाला ऐसा चित्ता । खेद वाते अपार ॥
अवलोकोनि हे पांडव । बंधुवियोग शोकार्णव ।
प्राशूनि झालों कुंभोद्नव । वज्रहृदयी पापात्मा ॥
सेखीं पांचही कुळदीपक । अस्ता पावले जेंवि अर्क ।
शून्य पडले तीन्ही लोक । तैसें आजी मज वाटे ॥
भीष्म द्रोण कृप बाल्हिक । शोकें स्पर्शले एकएक ।
दुर्योधनादि करिती शोक । सत्य मिथ्या नेणवे ॥
सकळ प्रजा करिती रोदन । म्हणती पांडव पंचप्राण ।
गेले यास्तव दु:ख दारुण । मरणातुल्य आमुतें ॥
दुर्योधनादि कृत्रिम क्लेशें । म्हणती ‘वोदिरा ! झालें कैसें ? ।’
येरू विलपे, कांहीं हांसे । म्हणे, ‘नश्वर सर्वही ॥
नवल नव्हे नृपाळा ! । काय काय देखणें पडे डोळां ।
ईश्वरेच्छा अलोट काळा । नये सहसा विश्वासों ॥
एका आधीं एका पाठीं । प्रत्यक्ष नाश देखिजे द्दष्टीं ।
हे मृत्युलोकींची राहाटी । कोण अक्षयी उरलासे ? ॥
गेलें अंतवंत म्हणावें । दिसतें साच केंवि मानावें ? ।
संसारस्वन्पींचे राणिवे । भुलों नये सर्वथा’॥
N/A
References : N/A
Last Updated : April 06, 2015
TOP