मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|
विसोबा खेचर

विसोबा खेचर

' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना.


“तंव धाउनी गेला चरणीं लागला ।
देवा तूं दाखविला ठेवा माझ्या मायबापाचा ॥१॥
जाऊन तो धरीन न सोडी मी आतां ।
जे मज पंढरिनाथा ग्वाही दिधली ॥२॥
तंव खेंचरू तेथें स्नानसंध्या करी ।
तंव ओढोनि पाय धरी विठा नामयाचा ॥३॥
तंव तो अवचिता खडबडोनि भ्याला ।
कोठुनि घाला पडिला धाडी मजवरी ॥४॥
उठीं परता तूं कोणाचा रे काय ।
ठायीं ठायीं राहें हालूं नको ॥५॥
तुझिया वडिलांसी जाब देईन ।
धरोनि नेईन हें पोर कोणाचें ॥६॥
लाडिकें लडिवाळ आपुलें बा धांवें पायीं ।
तूज कोणी नाहीं मग तूं निकाजिरें ॥७॥
छंद  ना बंद झोंबतोसी धीट ।
बांधीन चोहटा चौधाचारी ॥८॥
फजित करितील तुज कीं मज जाण ।
खेचर विसोबा म्हणे तुज विठोबाची आण ॥९॥

विमानाची दाटी पुष्पांची वर्षाव । अप्सरा गंधर्व नाचताती ॥१॥
अलंकापुर क्षेत्र इंद्रायणीतीर । मनीं ज्ञानेश्वर आठविला ॥२॥
मग आठविला पंढरीचा राव । देवाधिदेव पांडुरंग ॥३॥
सौम्य संवत्सर बाराशें एकतीस । शुद्ध श्रावणमास एकादशी ॥४॥
निर्गुन निराकार स्वरूपीं मिळाला । खेचर बैसला समाधीस ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : April 07, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP