मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|
मुक्तेश्वरांची कविता

मुक्तेश्वरांची कविता

' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना.


“वरुणदिग्वधूचें वदन । चुंबिता झाला सहस्रकिरण ।
हें देखोनि अति उद्विग्न । म्लानमुख पद्मिणी ॥
भ्रष्ट पुरुषाची जाती । ऐसा विकल्प धरुनि चित्तीं ।
चक्रवाकी आपुला पति । त्यजूनि जाती परपारा ॥
पवित्र स्पर्शला देखोनि दोषा । कलंकी उजळी आपुली दशा ।
क्षुद्र पावती संतोषा । तेंवि तारा झळकती ॥
गृहस्थ पडतां अनाचारीं । झाला आश्रित दिवा चारी ।
गाढनिद्रेव्या अंधारीं । निजावया चालिले ॥
समर्थ पावतां तेजहाणी । दूतिका गर्जती निंदावचनीं ।
पंकोद्बव नीचयोनी । म्हणोनि कुमुदें हांसतीं ॥”
“मुक्तेश्वर विनवी संतां । कृपाहस्त ठेवूनि माथां ।
शिकवाल तशी बोलूं कथा । शुकसारिकेसारिखी ॥”
शूरत्वाचेनि बळाभिमानें । पांचाळ मानी जैसीं तृणें ।
गजदळावरी पंचानने  । धांविजे तैसा धांवत ॥
घनें घातली सातवाकुडी । तैसी संधानक्रिया गाढी ।
धनुष्य ओढावया ओढी । वाव न साधे कौरवां ॥
भिन्न भिन्न शतसायका । नेमूनि विंधिलें एक एका ।
समोर यावया आवांका । सहसा कोणा न धरवे ॥
अग्निवेष गुरुची दीक्षा । लक्षितां न लक्षवे लक्षा ।
चोज वाटे मुख्यमुख्या । कर्णादिकां मानसी ।
द्र्पद म्हणे कौरवांतें । द्रोणासमान मानूनि मातें ॥
धनुष्य ठेवोनियां हातें । दंडवतें मज घाला ॥
माझ्या गुरुबंधूचे शिष्य । ते मी मानी आपुले दास !
विद्या अपूर्ण ते विशेष । मजपासाव अभ्यासा ।”
द्रुपदाचें शरसंधान । नागरिकांचें करताडन ।
तेणें कौरवांचें सैन्य । दाही दिशा भंगिलें ॥
धृतराष्ट्राचे बलिष्ट तनुज । राया दुर्योधनाचे अनुज ।
पळतां देखोनि पांचाळराज । टाळी पिटोनि हांसतसे ॥
म्हणे,‘अंधबालकें चक्षुहीनें । सैरा पळती आड रानें ।
हातीं धरूनि अभयदानें । नीट वाटे लावणें ॥
घाय वार लागले एका । दीर्घ स्वरें मारिती हांका ।
एक म्हणती, ‘राखा राखा । धांवा भीमा अर्जुना !’॥

N/A

References : N/A
Last Updated : April 06, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP