विठ्ठल चित्रकवि
' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना.
जो गोवर्धनपर्वतातळवटीं वेष्टीत गोपावळी ।
ज्याचे वेणुरवें ह्ळाहळ निवे दुष्टांसि जो निर्दळी ॥
ज्यातें बल्लवयोषिता मधुवनीं आलिंगिती चुंबिती ।
तो कल्याण कवींद्र विठ्ठल म्हणे हो श्रोतयां श्रीपती ॥९॥
छंदज्ञान विघंट नाटक रसालंकार काव्यक्रिया ।
जो जाणे गुरुदेवतावरकृपा सारस्वप्रक्रिया ॥
त्याचें शुद्ध कवित्व मान्य चतुरांमध्यें सभामंडळीं ।
वर्णी विठ्ठलदास तो कवि जगद्वंद्य स्वयं भूतळीं ॥१०॥
वाग्देवी ! उदरानिमित्त सदरा म्यां पाहिल्या सुंदर ।
पैं नोहे जठराग्निशांति विदुरा आला कलौपाहरा ॥
गर्भांधा बधिरापुढें श्रम पुरा तूं पावलीसी गिरा ।
हा माते अपराध तो कविवरा सर्व क्षमावा बरा ॥११॥
माझी स्फूर्ति सरस्वती मज म्हणे ‘बाळा कवी विठ्ठला ।
मद्वत्सा श्रमलासि ऐक सखया सांगेन जें मी तुला ॥
झाला ताप शमेल या हरिकथापीयूषपानें तुझा ।
भक्ताचे पुरवी मनोरथ हरी संदेह नाहीं दुजा ॥१२॥
श्रीसी गुप्त हरी सुधाब्धिजठरीं गेलासि मेरूदरीं ।
धाके शीत हरी हिमालयगिरीं चंद्रप्रभा अंबरीं ॥
झाला क्षीरसरित्पती शिव तरी दिग्वासलीला धरी ।
दाते यापरि वैखरी स्तुति करी भूभार पृथ्वीवरी ॥१३॥
जिव्हे ? तूं नटवी तुझे अनुभवीं श्रीमंत सन्मानवी ।
होती लुब्ध परंतु एकहि तुला कोणीच ना गौरवी ॥
सत्कीर्तीं बरवी जगांत उरवी व्युत्पन्नता बोलवी ।
सत्संगें नटवी पवित्र पदवी देशील ज्या सत्कवी ॥१४॥
व्यर्थ कां श्रमसि साधका मना ।
सोडिं हे विषयभोगकामना ॥
द्र्व्यलोलुप धरी जसा धना ।
तूं करी हरिपदाब्जसाधना ॥१८॥
यत्नें कल्पलतेस रायपुरिचें आळें बरें बांधिलें ।
साक्षेपें सुरधेंनुच्या पयरसें म्यां सर्वदा सिंचिलें ॥
ते वल्ली रुइचीं फुलें प्रसवली झाली निराशा मना ।
हे वांच्छा पुरवील कोण कविची श्रीपांडुरंगाविना ॥१५॥
ज्या नामें शतकोटि दग्ध दुरितें जैसीं तृणें पावकें ।
ज्या नामें गणिकेसि मोक्ष वरिता यानें विमानादिकें ॥
ज्या नामें तरला अजामिळ चमत्कारास तो पावला ।
जेणें उद्धरिला गजेंद्र मजही त्याचाचि लागो लळा ॥१६॥
विद्वज्जीवन पुण्यपावन कथा वैय्यासकें आपणें ।
श्रीमद्भागवतीं परीक्षितिप्रती सांगितली मी म्हणे ॥
जी गीर्वाण महापुराण दशमोस्कंधोत्तराची टिका ।
भाषा प्राकृत हे मराष्ट्र कविता व्युत्पन्न हो आइका ॥१७॥
श्रीमद्रामचरित्र तेंचि परिसा मंदाकिनी मद्निरा ।
श्रीमत्कृष्णकथा सुनील यमुना आली त्रिवेणीतिरा ॥
श्रीमत्काव्य सरस्वती प्रगटली श्रीविठ्ठलाची कळा ॥
श्रीमद्रुक्मिणिकांत दैवत भजा ग्रंथ प्रयागागळा ॥१८॥
N/A
References : N/A
Last Updated : April 06, 2015
TOP