मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|
दासोपंत ओंव्या

दासोपंत ओंव्या

' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना.


तुझेनि अहित जयां हितें । हित तुझेनि अहितें ।
आणि तूं मूर्ख जो ययांतें । बंधु म्हणतासी ॥७६॥
जन्मांतरी वैरी असती । ते देहसंबंधी होऊनि साधिती ।
ते मघांचि कळों येती । प्रीतीयोगें ॥७७॥
कवणें कपटफांस केले ? । द्यूतकर्मीं धर्मा जिंकिलें ? ।
राज्य कवणें हरिलें ? । सांग पां, गा ॥७८॥
कबरीं धरूनी द्रुपदीतें । सभे आणिलें सतीतें ।
वस्त्रहरणीं मातें । स्मरली पांचाळी ॥७९॥
तत्काळेंचि मी अर्जुना । नाशु करितों तुझ्या स्वजना ।
परि अनृत्यता  धर्मवचना । येईल म्हणौनि ॥८०॥
दु:खाची उकळी साहिली । क्रोधाची कळा प्रकाशिली ।
वस्त्रेंचीं तियेतें पुरविली । तये सभें ॥८१॥
तें तूं विसरलासी काये? । माझां हृदयीं कालविताहे ।
आतां मग उलंडोनि जाये । ऐसें वाटे ॥८२॥
काखागृह कवणें केलें ? । भीमसेना विष दिधलें ? ।
गिरिकंदरी लाविलें । कवणें तुम्हां ? ॥८३॥
ते म्हणतासि तूं स्वजन । तरी मिथ्या तुझें ममत्व मौन ।
असो, अहित हें देखोन । काय म्हणती ? ॥८४॥

N/A

References : N/A
Last Updated : April 05, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP