मुक्तेश्वरांची कविता
' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना.
म्हणे, ‘राया आशीर्थंचन । तूं भूपाळ मी ब्राम्हाण ।
तूं दाता सर्वसंपन्न । दीन आम्ही मागते ॥
अराजा मित्र नव्हे रायातें । ऐसें बोलिलां तें यथार्थते ।
आतां जरी मानेल तूतें । तरी मित्रत्व मानी कां ’।
द्रुपद म्हणे, ‘द्रोणाचार्या । करणें न लगे येथें आश्चर्या ।
हारी अथवा जय ऐश्वर्या । पुरुष पावे प्रारब्धें ॥
काळें लाभ काळें हाणी । याचा विचार कायसा मनीं ? ।
तोष लाभ परदूपणीं । चित्त न घाली जाणता ॥
अवगुणासि करणें गुण । हें उत्तम पुरुषाचें लक्षण ।
उचिता चुकला अज्ञान । तें सज्ञान स्मरेना ॥
दैवापुढें न चाले बळ । ऐसें बोलती विवेककुशळ ।
कुबेरसखा सर्व काळ । दैन्य भोगी शंकर ॥
असो, सुकृतबळोपायें । समर्थ करिती काय नोहे ? ।
तुजसारिका इच्छिलें लाहे । हें काय नवल सांगणें ?’॥
N/A
References : N/A
Last Updated : April 06, 2015
TOP