दासोपंत ओंव्या
' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना.
पृथ्वीचे राज्य तें किती । सार्वभौम गा श्रीपती ।
तें मातें तारक अंतीं । ऐसें नव्हे ॥२२४१॥
आतां तेचि विवंचना । सांगेन हृदयस्थ कल्पना ।
राज्यें येणें, श्रीकृष्णा । होईल दु:ख ॥४२॥
छेदूनि स्वजन हातियेरीं । पुरत्रयीचें राज्य जर्ही ।
म्या केलें श्रीहरि । एकलेन ॥४३॥
तर्ही तयाचें मज कारण । सांग पां श्रीकृष्णा कवण ? ।
जेणें भोगावें तें जन । रणीं हरपलें ॥४४॥
मी कवणाचा मग काईं ॥ माझें तें कोठें कव्हणी नाहीं ।
मागें पुढें देहीं । एकलाची मी ॥४५॥
येका शरीरक्षणातें । भिक्षेनें काय अपुरतें ।
मी त्रैलोक्यराज्य स्वार्स्थें । भ्रांत होआवें ॥४६॥
मरावें ते चुके मरण । भोगावें तें खरें प्राचीन ।
वाढवावें दुष्ट क्रियमाण । वाउगेंचि ॥४७॥
दैवाधीनता चुकली । कीं आधिव्याधि निमली ।
येणें राज्यें सिद्धि जाली । तें पै कवण ! ॥४८॥
राज्यें चुकलें पतन । कीं राज्य हें ज्ञानधन, ।
मोक्षस्वरूप निधान । आंगणीचें हें ! ॥४९॥
येणें देहबुद्धि चुकली । ज्ञानकळा उदैजली ।
यातायाति चुकली । संसारयात्रा ? ॥५०॥
ईश्वर म्हणतील मातें । मोक्षु देईन मी भूतांतें ।
उत्पत्तिस्थितिप्रळयातें । करीन सामर्थ्यें ? ॥५१॥
होईन काये जगदगुरु ? । मागुता नरु तो नरु ।
आपुलाचि घालीन भारु । दुसरेयावरी ॥५२॥
देवा ! कैसा रक्षिसीला । देवा ! काये देशील ।
देवा ! अरिष्ट निरसिसील । कवणे परी ? ॥५३॥
देवा देवा, म्हणतां । न चुके माझी पराधीनता ।
येणें राज्यें मी आतां । करुं काये ? ॥५३॥
देवा देवा, म्हणतां । न चुके माझी पराधीनता ।
येणें राज्यें मी आतां । करुं काये ? ॥५४॥
प्राचीन तेंचि भोगणें । तैं राज्यें हित काये येणें ? ।
कांहीं आत्महित करणें । तैं एक वांचूनि ॥५५॥
आणिक एक अनंता, । पुरत्रयीचें राज्य करितां ।
गेला द्रोणु तो मागुता | देखेन कैं ? ॥५६॥
पडिला जो भीष्मु रणीं । नसंपडे तो मागुतेनि ।
तैं मी ऐसा म्हणौनि । कवणु पाहिल ? ॥५७॥
दुर्योघना सादु देईं । तंव तो कवणे ठाई ? ।
पडलेल्या बंधूंची नाहीं । भेटी पुन: ॥५८॥
N/A
References : N/A
Last Updated : April 05, 2015
TOP