मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|
मुक्तेश्वरांची कविता

मुक्तेश्वरांची कविता

' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना.


बाप ब्रम्हाशापाची थोरी । राजा भस्मला सहशरीरीं ।
जाणते पुरुष हो संसारीं । ब्रम्हाणक्षोभ न घ्यावा ॥
ब्रम्हाशापें श्रीकृष्णासहित । यादव कुळासि जाला अंत ।
ब्रम्हाशापें भस्मीभूत । कार्तवीर्यवंशासी ॥
ब्रम्हाशापें शक्रसंपत्ति । पडिली समुद्राआतौती ।
ब्रम्हाशापें दंडक नृपति । परिवारेंसी भस्मला ॥
भगांकित सहस्रनेत्र । सलांच्छन रोहिणी मित्र ।
ब्रम्हाशापें दासीपुत्र । यम जाला भूलोकीं ॥
ब्रम्हाशापें सर्वत्व नहुषा । सरड देहो मृग नरेशा ।
ब्रम्हाशापें मुख्य महेशा । लिंगपतन निर्धारें ॥
श्रोतयांतें नमस्कार । वक्ता करी वारंवार ।
बाम्हाण क्षोभे तो प्रकार । नाचरावा कोणीही ॥
सप्तसमुद्रीचे लोट । धरामंडळीं एकवट ।
तैसे सेनेचे संघाट । घेऊनि वना चालिला ॥
वाजी वारण रथ पदाती  । संख्या करितां न धरवे गणती ।
सेनावसनें सर्व जगती । पांधुरविली समर्थें ॥
अनेक शस्त्रधरांचीम वृंदें । अनेक वाद्यें अनेक शब्दें ।
गर्जती तेणें विचित्र नादें । नादावलें अंबर ॥
कनकरत्नीं निरवाळलीं । गोपुरें गगन भेदीत गेलीं ।
तेथें वळघोनि पाहों ठेलीं । कामिनीवृंदें आवडी ॥
चंद्रमंडळीं पिकली धरणी । तैशा श्वेत  छत्राच्या उभारणी ।
रत्नकळसाचिया किरणी । कवि गुरु दोन्ही लोपले ॥
क्षीरसमुद्रीं तरंग उठती । तैसीं दिव्य चामरें झळकती ।
वीरश्रीसी राजनृपति । नक्षत्रीं चंद्र अवगमे ॥
सेनेसहित सेनानाथ । नगरगर्भीं जात मिरवत ।
हें देखोनि नारी शतानुशत । माडिया गोपुरीं वळघल्या ॥
कनककुसुमें कनकताटीं । आवडी धरूनि करसंपुटीं ।
अवलोकूनि राजमुकुटीं । पुष्पांजळी सांडिती ॥
एकीं अवलोकितां नयनें । म्हणती निवालीं अंत: करणें ।
एक म्हणती पंचबाणें । कामकुरंग वेधिला ॥
एकी भाविती निजमानसीं । समर्था घरीं होईजे दासी ।
गृहिणी होऊनि दरिद्यासी । राहटी करणें जळो तें ॥
एकी घरचारमाझारी । म्हणती पुजोनि शंकरगौरी ।
ऐसा भ्रतार स्वकीय जन्मांतरीं । पावोनि स्वेच्छा भोगावा ॥
एक पवित्र पतिव्रता । ईश्वर मानूनि स्वकीय भर्ता ।
ऐश्वर्यैसी अमरनाथा । भणंगप्राय अवलोकिती ॥

N/A

References : N/A
Last Updated : April 06, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP