मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|
शिव कल्याण

शिव कल्याण

' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना.


अगा कलिकालें आकलितां जन । हातीं घेऊनि ज्ञानखड्रग जाण ।
अवतरला आत्मा पूर्ण । ज्ञानेश्वर येथें ॥
अगा ज्ञानाज्ञान विहीन । निखळ ज्ञान मात्र संपूर्ण ।
म्हणोनि ज्ञानेश्वर ऐसी खूण । रूपा आली ॥
तेणें श्रीगीतालयाचें कपाट । उघडूनि केली मोकळी वाट ।
गीतेश्वर प्रगट । दाखविला लोकां ॥

विषयांचा ठायीं रति । होऊनि भगवंती विस्मृति ।
मग विषयीं गुंपती । सुखाचिया हेतु ।
त्या विषयीं जो रस । तो सुखाचा आभास ।
म्हणौनि दुरुनिचि सुरस । वाटती विषय ॥
जंव जंव विषय जोडे । तंव तंव दुर्मदुचि चढे ।
देखत देखत वेडे । होऊनि ठाके ।
जेंवि खदिरागारीं रत्न आशा । दरिद्रें धरुनि भरंवसा ।
दुरूनीचि जैसा । लागला नाचों ॥
मग भोगासी पात्र जाला । तंव दु:खें फळासि आला ।
मूर्ख मागुता राहिला । तळमळितु ॥
मागुती विषयांतें देखे । तंव तितुलेनिचि तोखे ।
एवं तळमळी कां हरिखे । सदा प्राणी ॥
हरिसुखाची प्राप्ति होती । तरी तत्काळ जोडती शांति ।
म्हणौनी माजती कां मरती । विषयी लोक ॥
एवं आत्मसुखासि मुकले । विषयीं आसक्त जाले ।
दैत्य शद्धें बोलिले । तेचि येथें ॥

एवं यशोदान्दाप्रती । प्रगटली श्रीकृश्णमूर्ति ।
तेथ मिनलिया समस्ती । व्रजयोषिता त्या ॥
मग एकवटलिया वृत्ति । नंदासी श्रीकृष्णीं प्रीति ।
होऊनी कृष्णभक्ति । वाढली बहु ।
तया भक्तिचें चिन्ह । आरंभिलें कृष्णार्चन ।
असो मिळोनि गोपीजन । नंदाचा गृहीं ॥
सांडुनि गृहकृत्यें । कृष्णीं जडलीं चित्तें ।
पावलिया आनंदातें । नंदालयीं तया ॥
जालें श्रीकृष्णाचें दर्शन । सांडिला विशेषें अभिमान ।
मग कृष्णोत्सर्व करून । आरंभिली क्रीडा ॥
आणून सुवासें तैलें । परस्परें सिंचन केलें ।
आणि हरिद्राचूर्णजळें । कर्दमु केला ॥
तेंचि तैलेंसहवर्तमान । रंगलीं मनें ॥
नाना कृष्णीं अवसर घडला । तेणें रंगे जन रंगला ।
तयाचि शोभा शोभला । अवष्टंभु अवघा ॥
असो, गोपी पावोनि आनंद । आरंभिला कृष्णाचा अनुवाद ।
नाना गीतीं गाइला गोविंद । व्रजयोषितीं तेथें ॥
अजन जो जन्मशून्य । किंवा या जनभेदें विहनि ।
असो, जेथें हें जनभान । निरर्थंकाभास ॥
नाना कृष्णीं रंगलें कन । नावडे कृष्णेंवांचोनि आन ।
म्हणौनि मनोरम्य कीर्तन । आरंभिलें कृष्णाचें ॥
म्हणौनि मनोरम्य कीर्तन । आरंभिलें कृष्णाचें ॥
आणि कृष्णीं जाली उत्सुकता । देखिला कृष्ण न व्हावा परता ।
झणि भंगो हे कृष्णकथा । रस भंगो झणीं ॥

N/A

References : N/A
Last Updated : April 05, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP