मुक्तेश्वरांची कविता
' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना.
चालिलें कौरवदळभार । जेंवी माजला जळसागर ।
बुडवावया पांचाळपूर । करिती भ्यासुर गर्जना ॥
कर्ण महापुराचा लोट । शल्य तो महा उर्मींचा संघाट ।
दु:शासनादि परमनष्ट । मत्स्य सैरा तळपती ॥
दुर्योधन महाग्राहो । शकुनि आवर्ता भोंवे पहा हो ।
ऐसा महार्णवाचा प्रवाहो । पांचाळपुरा प्रगटला ॥
बांधिला मथिला वरी लंधिला । एकें प्रासूनि निर्मूळ केला ।
तरी निर्लज्जगर्वाथिला । गर्जना करितो जलनिधि ॥
तेंवीं पांडवहस्तीं सकळ । अवमान पावले बहुत वेळ ।
तरी गर्वाचा गोंधळ । घालीत आले युद्धाथीं ॥
पांडवप्रताप पुरुष तरणा । नववधू कौरवसेना ।
शृंगारिली परी संघटना । युद्धसुरता न थारवे ॥
गळालें अभिमानाचें वास । श्रधैर्याचे मोकळे केंस ।
रणसय्यासनीं त्रास । पावोनियां पळाली ॥
कर्णसैंधव पयोधर पनि । मर्दितां झाले आरक्तवर्ण ।
शकुनि कंचुकी आवरण । पडिलें कोठें नेणवे ॥
शस्त्रधारा तीक्ष्ण दांतीं । चुंबितां मुख आंतलें क्षिती ।
झाली रुपाची उपहती । कौरवसेनावधूची ॥
ऐकोनि कर्णाचें उत्तर । विदुर बोले न्यायनिष्ठुर ।
दुष्ट नष्टाचा विचार । ऐसिया बोलीं जाणावा ॥
जे नेणती कपट लेश । आप्तभावें अति विश्वास ।
त्यांसी निष्कारण द्वेष । मुळींहूनि चालविंसी ॥
तुम्हांकडोनिउ रे दुर्बुद्धि । अपराध घडले पदोपदीं ।
त्यांचा अपराध एक शब्दीं । प्रगट करोनि बोल पां ? ॥
हित सांगतां भीष्मद्रोणा । तेथें तूं लाविसी दूषणा ।
धार्तराष्ट्र मुकतील प्राणां । तुझिये बुद्धी वर्ततां ॥
जे बोलती पुरुषार्थवचनें । ते वांझवृक्षाचीं सुमनें ।
राया ! विचारूनि मनें । हति आपुलें तें करीं ॥
हिडिंब वधिला वनांतरीं । बक मारिला एकचक्रीं ।
राजे पराभविले समरीं । शल्यादिक बळियाढे ॥
ते वेळीं यांची वीरवाटिवा । कोठें गुप्त ठेविली होती सर्व ? ।
आतां शद्धांचें वैभव । विस्तारूनि बोलती ॥
N/A
References : N/A
Last Updated : April 06, 2015
TOP