मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|
रमावल्लभदास

रमावल्लभदास

' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना.


हृदयें वचनेंहि रमावल्लभदासासि नत असों देहें ।
प्रभुसि म्हणेल. ‘स्वपदी दीनाचें चित्त रत असों दे हें’ ॥

“एकादशस्कंध एकतीस अध्याय । एका जनार्दनीं टीका अन्वय ।
जें मुमुक्षूचें मोक्षधन स्वयें । सांपडलें पाहे भागवत ॥”

“तंव दास म्हणती श्रीभागव्त । आम्हा सांपडलें जी निश्चित ।
भाग्य आमुचे परमादभुत । श्रीभगवंतें कृपा केली ॥”

“प्रगट पैं गुरुपरंपरा । कळल्यावीण साच नरा ।
मुक्ति नाहीं भ्रमाच्या घरा । जाणें होय साचार ॥
साचार गुरु नारायण । श्रीभग्वान होऊनी ॥
होऊनि श्रीभगवान । गुण निरसून ।
प्रथम ब्रम्हा समाधान । पावोनि श्रीनारदा सांगे ॥
सांगे श्रीनारद व्यासासी । व्यास सांगे श्रीशुकासी ।
श्रीशुक सांगे परीक्षिति रायासी । तेथूनि संन्यासपद्धती ॥
पद्धती संन्यासाची बरी । श्रीगौडपादाचार्य करी ।
तो संपूर्ण आत्मज्ञान धरी । श्रीगोविंदपादाचार्य ॥
श्रीगोविंदपादाचार्यांपासून । श्रीगोविंदपादाचार्य होऊन ॥
तेणें विवरण पूर्ण घेऊन । श्रीविवरणाचार्य समवेत ॥
समवेत षडाचार्य । श्रीशंकरबोधें उदार्य ।  
वादीं जिंकोनि भट्टाचार्य । दिग्विजय पैं केला ॥
केला बहु आचार्यासहवास । चहूं दिशीं सावकाश ।
तेथूनि संन्यासी दशनामास । पावते साच पैं जाले ॥
जाहल होते परमउदास । आचार्य जगीं सावकाश ।
हस्तामलक श्रीधर वास । सर्वत्र त्यांचा पैं असे ॥
असे श्रीमद्भागवत । श्रीधरमुखें विस्तारित ।
टीका भावार्थदीपिका मत । वेदान्त शास्त्र धरोनीं ॥
धरोनि अभेद हरिगुरुभजन । बहुत संत झाले ज्ञानघन ।
माजीं विज्ञानाश्रम पावन । तच्छिष्य आनंदाश्रम बोलिजे ॥
बोलिजे त्यावरी श्रीलक्ष्मीधर । तो अस्मादिकासि गुरुवर ।
भिक्षुकवृत्ति परी मनोहर । नैराश्यलक्ष्मी साच घरीं ॥
धरी नैराश्यलक्ष्मी बरी । जे लक्ष्मीवल्लभ श्रीनारायण हरि ।
म्हणोनि रमावल्लभदास सबराभरी । मग दासपणें तोचि दिसे ॥
हृदयमंदिरीं पूर्ण कृष्ण भरला । दुसरा वर्णावया ठावचि नुरला ॥
तथापि संत आज्ञा वानूं शिवाला । चिंतन करितां स्वयें कृष्णचि तो झाला ॥
जयदेव जयदेव जय जाश्वनीळा । अर्धांगीं पार्वती शोभे वेल्हाळा ॥ध्रु०॥
उमाशंकर ऐसिया आरती गातां । पूर्ण घ्याना मूर्ती आली तत्त्वता ॥
सर्वेचि कृष्ण तो परतोनी पाहतां । रमावल्लभदासा विस्मयोचित्ता ॥
म्हणोनि गुरुभक्ता भाविका । नारायणा परमसात्त्विका ।
चतुरांमाजी चतुर निका । जाणसी विवेका शास्त्रमार्गें ॥
शास्त्रमार्गें प्रवृत्ति । प्रतिपाळिसी गुरुभक्ति ।
गुरुवचनीं प्रेमप्रीति । नाहीं स्थिति इतरांसी ॥
इतरांसी हा भजनमार्गं । सर्वथा नव्हे चांग ।
श्रीरमावल्लभदास सांगे । म्हणोनि अभंग असावें ॥
आवडीस ऐसें रहा म्हणा । जाणा विश्वासाच्या खुणा ।
तेणें कार्य साधेल बहु जाणा । श्रीकृष्णगुरुभजनासी ॥
अवस्था अंतरींच घोंटावी । ब्राम्हा प्रपचीं प्रीति दावावी ।
सावध असावें गुरु अनुभवीं । लोकांमध्यं लोकसें ॥
या स्थितीनें आवढी । असतां आम्हा बहु गोडी ।
जाण भक्तिप्रौढी । गोपाळनामें वाढेल ॥
विश्वास बैसे श्रवणीं । जरी होय करणी ।
आवडीवेगळें पूर्णपणीं । काय लिहूं बहुसाल ॥
जरी वेगळेपण असावें । तरी कृपा असों दे म्हणावें ।
आवडीस सांभाळावें । हेंही लिहिणे न लगे ।

N/A

References : N/A
Last Updated : April 05, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP