मुक्तेश्वरांची कविता
' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना.
कन्यादेह तंव निश्विती । दिधला पाहिजे पुरुषाहातीं ।
विशेषें तुज ऐसा भूपति । परमदैवें पाविजे ॥
तुझिया ऐसी माझ्या चित्तीं । वर्तताहे अत्यंत प्रीति ।
परी वडिलां नेणतां हे रीति । व्यभिचारधर्मीं लागतसे ॥
यालागीं नावेक धरीं धीर । आश्रमा येईल ऋषीश्वर ।
वचन मान्य करूनि अत्यादरें । मज ओपील तुज हातीं ॥
पुरुषसंगें शंकान्वित ॥ बाहेर नये लजाभरित ।
हें देखोनि सर्वज्ञनाथ । जाणता झाला मानसीं ॥
जामात - कन्यामैथूनराहाटी । ऋषीनें देखिलें ज्ञानद्दष्टी ।
परमसंतोष मानूनि पोटीं । आश्वासीत कुमारीतें ॥
म्हणे “माझिये निजात्मजे । बाहेर येईं सांडूनि लाजे ।
कर्तवुअ होतें पैं सहजें । सिद्धि नेलें प्रारब्धें ॥
जें झालें तें बरवें । मान्य केलें माझिये जीवें ।
कष्टीं न मिळे तें स्वभावें । पूर्वदैवें जोडिलें ॥”
ऐकोनि पित्याची अभयवाणी । कन्या येवोनि लागली चरणीं ।
म्हणे, “म्यां वरिला भूपाळ गुणी । तो त्वां मान्य करावा ॥
कृपानुग्रह वरप्रसादें । गौरवीं आशीर्वचन शद्वें ।”
ऋषि बोले परम आल्हादें । ‘चिरंजीव तव भर्ता ॥
शचीसुरेशासारिखें । दोघें असा अक्षय सुखें ।
विष्णु शक्तिसमान तुके । ऐसा पुत्र पावसी ॥
सुंदर प्रौढ समर्थ वनिता । चिरकाळ पितृगृहीं वसतां ।
लोकनिंदेचा अवचिता । पाषाण पडे मस्तकीं ॥
हो कां उत्तमाची कुमरी । बहु काळ वर्ततां माहेरीं ।
उद्धत होय विहिताचारी । तोही शद्ध वडिलांतें ॥
माता पितरीं स्नेह कळवळा । बहु काळ समीप ठोवेतां बाळा ।
काजळ लावी पितयाच्या भाळा । होय अपकीर्ति लौकिकीं ॥
स्वयें नर्तन गायन । गीत नृत्य अवलोकन ।
शृंगार कामशास्त्रश्रवण । हेंचि दूषण कुलवंते ॥
परघर - अटण परघरवस्ती । जारजारिणीची संगती ।
एकट शय्या एकट पंथी हें । कुलक्षण कुलवंते ॥
क्षणक्षणा चंचलपणें । चिरनिरिया सरसावणें ।
कच्छ फेडणें घालणें । कुलक्षण कुलवंतें ॥
हृदय दाऊनि घाली पदर । पुरुष अवलोकूनि वाढवी हार ।
परकियासी एकांत विचार । हें कुलक्षण कुलवंते ॥
आणिका वर्णी निंदी भर्ता । पति त्यागूनि धांवे तीर्था ।
पृरुष अव्हेरूनि देवतां । भजतां दूषण कुलवंते ॥
उपेक्षूनि पतिईश्वरु । आणिक महानुभाव करी गुरु ।
भजनीं लोकनिंदेचा सोर । माजें थोर अभिशापें ॥
यत्नें शर्करा ठेविजे जेथें । परी पिपीलिका लागती तेथें ।
विश्वासस्थलीं ठेवितां वनिते । तेथेंचि विपरीत उद्धवे ॥
शिखा स्वस्थानीं साजिरी । भ्रतारगृहीं पवित्र नारी ।
शोभा श्लाध्यता मान्यता थोरी । उभय लोकीं ते पावें ॥”
N/A
References : N/A
Last Updated : April 06, 2015
TOP