विसोबा खेचर
' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना.
भवजलधि अगाध तरावया दुस्तर । रचिलें पंढरपुर चंद्रभागीं ॥१॥
तारूं पंढरिनाथु मोलेंविण उतरितु । उभला असे तिष्ठतु वाट पाहे ॥२॥
बुडत्याचें भय नाहीं संसारीं । कलिमाजी पंढरिनाथ थोर ॥३॥
राव रंक दोन्हीं बैसवोनी वरी । उतरितु पैलतीरीं भरंवसेनी ॥४॥
अठराही आवले जे नावेसी लागले । साही खण भरले मिरवताती ॥५॥
चौमुखी वर्णितां न कळे याचा पार । वेदा अगोचर सहस्रमुखा ॥६॥
सडियातें कासे लावीत आपण । कुंटुंबिये जाण नावेवरी ॥७॥
प्रेमाचे पेटे बांधोनियां पोटीं । तारी जगजेटी पैलपारू ॥८॥
आप अंगें उडी बुडत्यातें कडे काढी । ऐसे लक्ष कोडी तारियेले ॥९॥
सहस्र नाम पेटे बांधीं मग पोटीं । तारी जगजेठी लावी कासे ॥१०॥
आदिकरोनि सर्वहि तारिले । तरुनी नेले पैलतीरीं ॥११॥
ऐसे पक्षी कीटक गुल्मक तारिले । खेचर विसा म्हणे तारी मातें पुंडलीक ॥१२॥
N/A
References : N/A
Last Updated : April 07, 2015
TOP