मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|
मुक्तेश्वरांची कविता

मुक्तेश्वरांची कविता

' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना.


मग गर्जोनि नराधीशें । म्हणे “या आश्रमीं कोण असे ।”
हें परिसोनी इंदिरावेशें । लावण्यकलिका साजिरी ॥
कनकलतिका सौदामिनी । कीं चंद्रकला तनुधारिणी ।
सुवर्णकेपत्रवर्णीं । सुगंधखाणी हरिणाक्षी ॥
रूपयौवन चातुर्यभरिता । बाहेर पातली मुनीश्वरदुहिता ।
अत्यादरें धरित्रीकांता । पवित्रासन ओपिलें ॥
स्वागत पुसोनियां वचनीं । अर्ध्यपाद्यादि पूजनीं ।
राजा तोषवोनि वचनीं । अर्घ्यपाद्यादि पूजनीं ।
राजा तोषवोनि बहुमानी । कुशळ विचारी कुशळचें ॥
“दर्शनेम स्वानंद जाला मयनां । नाम अभिधान करावें श्रवणा ।
परिचयज्ञानें अंत:करणा । अष्टभावें भेटणें ॥”
ऐकोनि चातुर्याच्या गोष्ठी । राजा चमत्कारला पोटीं ।
म्हणे, ‘हे वयें धाकुटी । विचारवृद्ध दिसताहे ॥’
मग म्हणे, “वो सुलक्षणे ! । गुनालये कमलेक्षणे ।
तुझेनि वचनमात्रें क्षणें । श्रम सर्वही हरपला ॥
मैथुली नरेंद्रपुत्र जगतीं । दुष्यंत राजा चक्रवर्ती ।
ऐकिला असेल तरी हे मूर्तिं । ओळखीं द्दष्टीं सुजाणें ।”
धराधीशा !  स्वधर्मपाळा । तुझिया शुद्ध यशाचळा ।
कीर्तिशृंगेम रविमंडळा । भेदूनि गेलीं सुतेंजें ॥
कृकर्मकुशिल घेऊनि हातीं । अमर त्यातें छेदूं पाह्ती ।
होऊं पाहसी, माझिये मती । अयुक्त ऐसें दिसताहे ॥
अमृत म्हणोनि हाळाहळ । प्रांशिल्याचें कवण फळ ।
बाळ म्हणोनि धरितां व्याळ । अनर्थ वाजे रोकडा ॥
आम्हां स्त्रियांची संगती । भली नव्हे गा मेदिनीपती ।
मातल्या काम भद्रजाति । विवेकांकुशें वळवावा ॥”

N/A

References : N/A
Last Updated : April 06, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP