मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|
मुक्तेश्वरांची कविता

मुक्तेश्वरांची कविता

' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना.


गदा घेऊनि उतावीळ । पुढां धाविन्नला भीम सबळ ।
जेवी मांडिल्या प्रळयकाळ । दंडपाणि भूतांतें ॥
पादचारी रणवेताळ । घोषें गर्जवी ब्रम्हांडगोळ ।
वर वळला देखोनि विकळ । रणोत्साह वीरांचा ॥
तिमिंगल रिघे समुद्रजळीं । तैसा भीम पांचाळदळीं ।
बळें मिसळतां खळबळी । सेना यज्ञसेनाची ॥
असंख्यात कुंजरथाट । स्त्रवती मदोदकाचे पाट ।
त्यावरी उठावला बळिष्ठ । गदाघायीं ताडित ॥
कुंभस्थळापासूनि धरणी । रक्तप्रवाह ताम्रवर्णीं ।
मुक्ताफळांचिया श्रेणी । उभयभागीं विखुरल्या ॥
गदाघायीं कुंभस्थळें । फुटती जैसीं सुपक्व फळें ।
कीं मृदधटपंक्ति लोहमुसळें । जेंवी फुटतीं फटफटा ॥
नागरिकें मानूनियाम दीनें । न मारिजेती भीमसेनें ।
शद्वें वळिजेती गोधनें । तेंबी म्हणे ‘परता रे ! ॥
अशुद्ध नदीचे खळखळाट । पुसती सागराची वाट ।
मार्गं दावावया नीट । अपार प्रेतें चालिलीं ॥

N/A

References : N/A
Last Updated : April 06, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP