मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|
रमावल्लभदास

रमावल्लभदास

' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना.


मुळीं लागतां सहज । मायबाप नाहिंत मज ॥
झालों पोसणें संताचें । मन कोंवळें तयांचें ॥
गोत्र अगस्ति होतें साचें । आतां गोत्र व्यापकाचें ॥
ऋग्वेदी होतों पहिले । आतां भागवती वहिले ॥
नामघोषाचा आचारु । श्रीमद्नीतेचा विचारु ॥
पूर्वीं संध्या ते त्रिकाळ । प्रेमसंध्या सर्वकाळ ॥
पूर्वीं गुरु तो मतभेदी । आतां मत जी अभेदी ॥
पूर्वी बोलिलों लौकिक । आतां बोलें अलौकिक ॥
पूर्वीं मान म्यांच घ्यावा । आतां मान सर्वां द्यावा ।
पूर्वीं रुचे चतुरपण । आतां भोळीव आपण ॥
पूर्वीं मुक्तीलागीं बाहे । आतां तारक मजला करी ॥
पूर्वीं होतों परतंत्र । आतां सर्वांशीं स्वतंत्र ॥
पूर्वीं रुचे रूप नाम । आतां नाहीं त्याचें काम ॥
नामरूप जाउनि भास । अवघा रमावल्लभदास ॥

N/A

References : N/A
Last Updated : April 05, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP