मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|
आनंदतनय

आनंदतनय

' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना.


ऐसी देखिली द्वारका । दीनोद्धारका ॥ध्रु०॥
विविध उपवनें मलयजपवनें डोलति फळदळकुसुमभरें ।
कुसुमित बकुळी निबिढ अळिकुळीं रुणझुणती अनुदिनिं निकरें ॥
हंस - का - बक - शुक - शिखि - पिकमुख उचलुनि निगदिति मधुर स्वरें ।
परिमळ घमघम पसरतसे मग जग नगसुख अनु भविति बरें ॥ऐसी०॥
भंवतिं उपपुरें गुढया गोपुरें निबिड जयां हें नभ अपुरें ।
ट्के पट चिरें तळपति रुचिरें झळकति गगनीं जंव अचिरें ॥
सौधसुशिखरें सेविति नभ खरें दिसति घरें मणिमय मकरें ।
शातकुंभनवकुंभविराजित भरति घरें मणिमय कमरें ।
कनकतोरणीं कलितधोरणीं लसति खाणि बहु ज्या उपर्‍या ।
लखलखती वरि नसे ज्यासि सरि हेमविनिर्मित बुरुजचर्‍या ॥
सघन अचाटें वज्रकपाटें पुर दरवाजे मेरुदर्‍या ।
आनंदतनय म्हणे प्रतिमंदिरिं नवनिधि नांदति बहुत बर्‍या ॥ऐसी०॥

कांही एक तटस्थ होऊनि सभाप्रांतीं उभा राहिला ।
श्रीकृष्णें कमलेक्षणें प्रियसखा प्रेमादरें पाहिला ॥
आधीं पाय नमूनियां मग भुजीं आलिंगिला प्रेमळें ।
स्नेहें पूर्ण सुधामयें निगदिलीं वाक्यें महाकोमळें ॥
“मत्पुण्य तें पूर्ण फळास आलें । बा रे तुझें दर्शन आजि झालें ॥
स्मरूनियां तूं मज भेटलासी । सुधानिधी सन्निभ वाटलासी ॥”
“दादा चला” म्हणुनि हात धरुनि देवें । सिंहासनीं बसविला मग वासुदेवें ॥
आज्ञापिली जलधिजा द्विजवंदनातें । हांसोनि ते नमितसे समजोनि नातें ॥
त्यानंतरें देव तया सुदाम्या । वार्ता विचारी विबुधा सुधाम्या ॥
“आहे बरी कीं वहिनी सुवृत्ता । बाळें बरीं लीं वद हयाचि वृत्ता ॥
कांहीं आठवतें गडया शिशुपणीं साळेंतलें खेळणें ।
नाना हास्यविनोद मोद सगडी कुस्ती करुं हेळणें ॥
मी तूं हा मज तूज भेद न जगीं ते मूळ मैत्री भली ।
येतें कीं स्मरणासि जाण सखया पुण्यें बहू लाधली ॥
आम्हां भेटी आणिला काय मेवा । तूं भूदेवा देई सर्वस्व ठेवा ॥”
जों जों देखे देव काखेंत बोळा । तों तों त्याचा होतसे जीव गोळा ॥
मग विभु वसनासी त्याचिया हात घाली ।
उकलुनि जंव पाहे, मुष्टि पोहे, निघाली ॥
द्विजवर दुबळा तो फार संकोच मानी ।
हरि तरि बहु वानी पूर्ण भक्ताभिमानी ॥
“मजवरि सखय़ा त्वां स्नेहसंभार केला ।
श्रमवरि चिरकाळें येउनी द्वारकेला ॥
शुभ दिन दसरा हा आजि वाटे दिवाळी ।
न मज गमति पोहे दीधल्या वैभवाली ॥”

N/A

References : N/A
Last Updated : April 05, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP