मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|
महादाइसा ऊर्फ महदंबा

महादाइसा ऊर्फ महदंबा

' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना.


“ जालें हें संपूर्ण रुक्मिणीसैंवर :
मातृकी नागर ओवीबंधीं ।”

“श्रीदत्ता चक्रपाणी कृष्णा जी नागरा :
श्रीप्रभु चक्रधरा नमन माझें :”

“कांसे पीतांबरु कंठीं कुंदमाळा :
कांतु शोभे सांवळा :रुक्मिणीचा :
खांदावरि कावडी पडिभरें चालतु :
तो खेळे वनांतु : दत्तु सए :
गावो द्वारावती गोमतीद प्रातीं :
गोदरीयें क्रीडती : चक्रपाणी :
घावो देऊनि अविद्ये घाली निजपदीं :
खेळे कृपानिधि : रिधपुरीं :
चांपैगौर कांती चांपयाच्या दृति :
चांपौलीं साजती : चक्रपाणी :”

“ जीवावेया वैरी जरासंधु समरीं :
बीजें केलें मुरारी : कौंडण्यासी :
झळकती झालरी झेंपावती टके :
देखौनि मनीं शंके : शिशुपाळु :
ज्ञनानीति झेंगटा घंटा येकीदाटा :
पुढां चाले थाट : कुंजरांचे :
येतु चक्रपाणी तुरांचां गजरीं :
ते निहे अंबरीं : उठीताति :
येंन्नें येकनादें गर्जती अंबरें :
तेणें मेरुशिखरें : कांपताति :”
टाळ घोळ वीणे टमळ वाजती :
रथीं वारु चालती : पवनवेगीं :
टाकीलें नगरु तुरांचे गजरु :
पातले जाळीकारु : भीमकाचे :
ठीकांचां भद्रीं उभी ठाकौनि रुक्मिणी :
पाहे चक्रपाणी : वल्लभातें :
ठीकलग ध्वजु रथु माणिकीं शोभतु :
विप्र असे दावितु : भीमकीयेतें :
डोळस सांवळा देखे भीमबाळा :
मेघडंबरीं नीळा : कृष्णरावो :
डोळे अश्रुजळीं देह न संभाळी :
झेंप तिये वेळीं : घालूं पाहे :’

“ लीळावसें करु देउनि मुरारी :
रथीं वाइली कुमरी : भीमकाची :
लागौनि श्रीचरणा देखतां सकळां :
रुक्मिणी गोपाळा : माळ घाली :
क्षेत्री उठावले हरिली रुक्मिणी :
घसरे सैन्यें दोन्ही : भीडीनलीं :
क्षिती कांपे सुर पाहती अंबरीं :
जींतीएले वैरी : रामकृष्णीं :
आइकौनि रुक्मिया कोपें धावीनला :
मग धरुनियां बांधिला : ध्वजस्तंभीं :
आलासि रुक्मिणी सोडवूं सर्वथा :
भादरीला माथा : रुक्मियाचा :
इक्षितु सर्वंज्ञ हांसौनि रुक्मियां :
तंव रामु म्हणे मेहुणेंया : मानु केला :
इंद्र चंद्र ब्रम्हा मिळौनियां सृष्टी :
करिती पुष्पवृष्टि : कृष्णावरी :”

वाचितां आइकतां देवाचें चरित्र :
होती प्रेमपात्र : शुद्ध बुद्धि :

N/A

References : N/A
Last Updated : April 07, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP