दासोपंत ओंव्या
' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना.
म्हणतसे, दावा रे तो पाडेवार । यास्तव फुटतात कीं माझे नेत्र ।
नेत्रांचें तेज साचार । तो मजला ऐसा पैं गमतो ॥१॥
जळो जळो हे द्रब्यराशी । यास्तव संभाषण त्यासी ॥
नाहीं केलें कीं, मी पापराशी । तो कैसा मजला भेटेल ? ॥२॥
तो काय या सभास्थानीं । गेला कीं मोह घालुनी ? ।
सर्वत्रांची द्दष्टी चोरुनी । गेला कोठें कळेना ॥३॥
त्यासी देऊनि फार इनाम । करूं त्यासी अति संभ्रम ।
या बाळासी पाठवूं त्या समागम । ऐसी इच्छा पैं होती ॥४॥
हुडका, हुडका रे ! चहुंकडे । गेला गेला तो कोणीकडे ? ।
सत्वर आणा रे ! द्दष्टीपुढें । माझ्या आतां अविलंवें ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : April 05, 2015
TOP