मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|
महादाइसा ऊर्फ महदंबा

महादाइसा ऊर्फ महदंबा

' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना.


“नग्नी प्रवेसु जाला राउळाभीतरी: ।
ब्राम्हाणां आडकाठी नाहीं तीय द्वारीं :
सप्तही दारवठे देखे तथा भीतरी कृष्णमंदिरें :
रत्नखचितें रम्यें सरि न पवती मेरुसीखरें :
विप्रें देखियला कॄष्ण यादवांचा राणा :
योगिय - मुनिजन संन्नेधी - चरण :
उपविष्ट सिंहासनीं देव किन्नर वोळग करिती :
यादवीं परिवारितु सहस्र कनकदंडे लक्षावरि ढळती :
सभा देखौनियां बहु उछावो मनीं :
तंव विप्रें देवासि घातलें लोटांगणी :
राखैं राखैं प्रभुराया तूं स्वामी माझा मी तुझा दासु :
करुणाकरांचा रावो जन्म सुफळ देखिले हृषीकेशी :
दर्शन देउनि श्री (शिरीं) धरियले चरण :
पुरे पुरे म्हणे कृष्ण यादवांचा राणा :
दिव्यासन घालुनियां देवें विप्रासि करविली पूजा :
निवालों कृष्णदर्शनें नेणें मी कव्हणें काम्हाचें काज :”

N/A

References : N/A
Last Updated : April 07, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP