मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|
विठ्ठल चित्रकवि

विठ्ठल चित्रकवि

' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना.


केला प्रवेश नगरांत जवें सुदेवें ।
बोले अपूर्व रचिलें स्थल वासुदेवें ॥
सिंहासनीं मदनमूर्ति उदार जेथें ।
आला त्वरे करुनियां द्विजराज तेथे ॥४७॥

चित्स्वरूप नटलें जनीं वनीं ।
नाठवे हरिविणें दुजें मनीं ॥
देखिली मदनमूर्तिं लोचनी ।
जे उदार भवबंधमोचनी ॥४८॥

देखिला द्विज सुदेव माधवें ।
हर्षयुक्त अति दीनबांधवें ॥
गौरवें बसविलें निजासनीं ।
लाभ तो बहुत मानिला मनीं ॥४९॥

आपणासि सुर जेंवि पूजिती ।
अर्चिला द्विज तसा बर्‍या रिती ॥
भोजनादि उपभोग देऊनी ।
बैसले स्थळ विविक्त सेवुनी ॥५०॥

धरूनि हस्तांबुज वाग्विलासें ।
पृच्छा किजे मंद उदार हास्यें ॥
कथा निवेदा सुरसा अपूर्वा ।
सुवृत्त जाणा ‘विपरीतपूर्वा’ ॥५१॥

अहो सुदेवा परिसा द्विजोत्तमा ।
विचारितां ब्राम्हाण देवसत्तमा ॥
परंतु त्याची स्थिति भिन्न देखणें ।
सुवृत्त वंशस्थ वदेल लक्षणें ॥५२॥

असंतुष्ट त्या इंद्र तोषूं शकेना ।
गृहीं कामधेनू तयाचे दुभेना ॥
अहंकार ज्याहीं असे दग्ध केला ।
स्वयें त्याचिया दर्शनाचा भुकेला ॥५३॥

असंतुष्ट संपत्ति एका असोनी ।
सदां तुष्ट लक्ष्मी कितेकां नसोनी ॥
समाधान चित्तीं जयाच्या सुदेवा ।
असे वंद्य त्याची करीं पादसेवा ॥५४॥

तुम्ही आपुलें कार्य सांगा सुदेवा
पुरी कोण ? कोठूनि आलेति देवा ?
अटव्यें वनें चालतां भागलेती ।
किमर्थं द्विजा या स्थळा पातलेती ? ॥५५॥

N/A

References : N/A
Last Updated : April 06, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP