मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|
विठ्ठल चित्रकवि

विठ्ठल चित्रकवि

' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना.


मज तारिं गे अंबे जगदंबे भवानी ॥ध्रु०॥
लसत्सरसिजाननारविंद नेत्रे गे ।
चलत्कुंडले सुकुंतले सुगात्रे गे ।
लसन्नासिके हरप्रमोदपात्रे गे ।
अति जडमति विनवुं मी किति ।
तुज भगवति चलकलगति अंबे ॥१॥

हरि आला आजि घराला गे ॥ध्रु०॥
मुरलीवाला धरि वनमाला ।
मृगमद भाला कीं लक्षुनि त्याला ।
हा जीव निवाला ॥१॥

नील तमाला कृतशुभगाला ।
निरखुनि झाला प्रमोद मनाला ।
विविध करणाला ॥२॥

पदनिरतांला दे अमृताला ।
वंदुनि त्याला विठ्ठल धाला ।
कीं तन्मय झाला ॥३॥

जो जो जो जो रे कुळभूषणा ! दशरथनंदना ।
निद्रा करिं बाळा मनमोहना । रामा लक्ष्मणा ॥ध्रु०॥

पाळणा ळांबविला अयोध्येसी । दशरथाचे वंशीं ।
पुत्र जन्मला हषिकेषी । कौसल्येचे कुशीं ॥१॥

रत्नजडित पालख । झळके अमोलिक ॥
वरती पहुडले कुळदीपक । त्रिभुवननायक ॥२॥

हालवी कौसल्या सुंदरी । धरुनि ज्ञानदोरी ।
पुष्पें  वर्षिली सुरवरीं । गर्जति जयजयकारीं ॥३॥

विश्वव्यापका रघुराया । निद्रा करिं बा सखया ।
तुजवर कुरवंडी करुनियां । सांडिन आपुली काया ॥४॥

येऊनि वसिष्ठ सत्वर । सांगे अन्मांतर  ।
राम परब्रम्हा साचार । सातवा अवतार ॥५॥

याग रक्षुनियां अवधारा । मारुनि रजनीचरां ।
जाइल सीतेच्या सैंवरा । उद्धरि गौतमदारा ॥६॥

पर्णिल जानकी सुरूपा । भंगुनियां शिवचापा ।
रावण लज्जित महाकोपा । नव्हे पण आ सोपा ॥७॥

सिंधुजलडोहीं अवलीला । नामें तरती शिळा ।
त्यावर उतरोनी दयाळा । नेसी वानरमेळा ॥८॥

समूळ मर्दूनी रावण । स्थापिल विभीषण ।
देव सोडवील संपूर्ण । आनंदेल त्रिभुवन ॥९॥

ऐसीं चरित्रें अपार । करील मनोहर ।
इतुके ऐकूनि उत्तर । हांसले रघुवीर ॥१०॥

राम भावाचा भुकेला । भक्ताधीन जाला ।
दास विठ्ठलें ऐकिला । पाळणा गाईला ॥११॥

कोणे एक वनीं विचित्र पुतळा जेवावया बैसला ।
पात्रीं जेवण जेवितां अतिबळें पात्रेंचि तो भक्षिला ॥
त्याची जे वनिता वनांत फिरतां सूर्यास प्रार्थीं सदा ।
बोले विठ्ठल हा पदार्थ उमगा षण्मासिंचा वाथदा ॥

महा माघीं रौद्रीं द्दग नभ कला शालिवहनें ।
पदें पद्यें त्रेताळिस कवि विठ अर्थगहनें ॥
बिडाखालीं गौरीपुरिं कृत कथा पुण्यकरणी !
करू  कल्याण श्रीयमनसभलाग: शिखरणी ॥

N/A

References : N/A
Last Updated : April 06, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP