आनंदतनय
' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना.
सौधांगीं विबुधांगनाचि वदती तैशा सख्या तीप्रती ।
तों तेथें भुजराजिमंडिततनू आला धनुष्याप्रती ॥
शेषाकार अशेष भूषण गणीं शृंगारिलें देखिलें ।
द्दष्टीं कार्मुक रोखिलें मग मदें तेणें हळू लेखिलें ॥
हातीं थापटिल्या भुजा मज असा नाहीं त्रिलोकीं दुजा ।
मेरूही मजशीं खुजा सुरवरीं माझीच आधीं पुजा ॥
ऐसा जल्पुनि चाप जाड उचलों जातां न हाले कदा ।
जैसा शैल मतंगजासि न ढळे, पाहे विदेहात्मजा ॥
एका दों न ढळेचि कार्मुक करें हें नेटकें जों कळे ।
लावी हात बळें समग्रहि तदा तों कांहिंसे आकळे ॥
मोठी आरभटी करुनि चुकटी दंतावळी चावुनी ।
आक्रोशें अतिविक्रमें क्षितितळीं जानुद्वया लावुनी ॥
विसां करांहीं धनु तें न तोले । न सांवरें यास्तव देह डोले ।
भारें तयाच्या बहु खाय झोले । त्याहीमधें रावण काय बोले ॥
“या भूपें पण जिंकिला, उभविलें कोदंड चंडाकृती ।
मद्दोर्दंड उदंड दंड करिती शाबास माझी धृती’ ॥
डोले बोलत बोल तों न धरवे गेलाचि झोला भला ।
आलें चाप अपाप त्यावरि उरीं तो भूतळा पातला ॥
आला भूमितळासि गर्वपुतळा पिंजारुनी कुंतळा ।
चापातें उखळावया बळ खळा नाहींच उत्सृंखळा ॥
सर्वांगींच कळा विटे मुखकळा झाला भुजामोकळा ।
वाजे ऊर गळा स्वदेह सगळा झिंजाडितां आगळा ॥
N/A
References : N/A
Last Updated : April 05, 2015
TOP