भास्कर कवीश्वर
' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना.
ना तरी मेघमंडळें । काई चातक लाचाविलें ।
कीं चंद्रें मूळ पाठविलें । चकोरासी ॥
भेटती द्रावळ गोटे । तर लोहासी झरा फुटे ।
सोमकांता गणती थेंबुटें । चंद्रकरास्तव ॥
ना तर देखोनि रविमंडळ । विकासे कमळांचें बांबळ ।
कोंभेजे केतकीजौळ । मेधींकरोनि ॥
तैसा सुवर्म जोडे श्रोता । तर रसभावीं फुले कविता ।
तोवर येती सारस्वता । नवरसांचे ॥
सामतयाची आणि । रौन वोविजे मुक्तामणि ।
तरी चक्रवर्तीचा कंठभूषणीं । योग्य होय ॥
तैसिया जाणाचिया सभा । शोधिजे शब्दरत्नांचा गाभा ।
तैं मिरवे अलंकारशोभा । कवितावधूसी ॥
तिये कवितेची गोडी । कोकिळांची तराय मोढी ॥
गीतसाळ करी कुडी । किन्नरांची ॥
आपुला कलरवीं । कविता कलहंसातें पढवी ।
तें रंग माधुर्य शिकवी । मधुकरातें ॥
आंगीचिया सौरभ्यकळा । उणें आणी परिपळा ।
गांभीर्य करी अवकळा । गगनगंगेसी ॥
रतीचिर्य भृल्लतेसी । ते चातुर्य कासी ।
पडप दे संध्यावधूसी । अंगरागाचें ॥
पदप्रमेयाचें गुंफणें । श्यामाभुजबंधातें जिणें ।
कोंवळीक झाली सिरणें । शिरसपुष्पेंसी ॥
निच निच तारागण । वरी दिजे संध्यारागाचें रावण ।
तरी अक्षराचें रसरंगपण । अधिक दिसे ॥
पदाचा मेळावा । रत्नाकरा करी चढावा ।
प्रमेय करी हेवा । अमृतलहरींसी ॥
पीळलिया चंद्रबिंब । सूटती अमृतधारांचे कदंब ।
तैसे फुटती तुंब । नवा रसांचे ॥
ऐसिये कवितालते । ब्रम्हाविद्येची फुलें दिसती फांकते ।
तरी पसरलेनि हातें । कवण न तोडी ॥
पवित्रा गंगोद्का । सरिसी परतिजे कस्तूरिका ।
तरी परिमळाचिया कवतिका । कवण न लवी ॥
कापूरकेळीचा पदरीं । दिसती तुळसीचिया मंजिरी ।
तरी तोडून कबरभारीं । कवण न बंधे ॥
लीलांदोलनलोलकंकणरणत झंकारचारुस्वनै: ।
गीतै: सुंदरनूपुरैरणुरणन्माणिक्यमालाकुलै: ॥
स्विद्यन्मौलिकपालभालफलकैरगौरनगाल सै - ।
र्नत्यद्बिर्वजसुंदरीभिरमित: कृष्णो वृत: पातु व: ॥
N/A
References : N/A
Last Updated : April 07, 2015
TOP