मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|
नागेश कवि

नागेश कवि

' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना.


चंद्रावळी चालत मध्यदेशीं ।
सभोंवत्या मोंवति त्या सुकेशी ॥
बिंबाधरा त्या चतुरा उदारा ।
त्या देखिल्या होय मना विदारा ॥१॥
रुळत चंचळ अंचळ भूबरी ।
उसळतो नलयध्वनि अंबरीं ॥
निजगुजें वदती मग सुंदरा ।
दिसतसे बहु धन्य वसुंधरा ॥२॥
मदभरें मग गौळणि चालती ।
थरथरां स्तनमंथर हालती ॥
कितिक त्याग गजगामिनी डोलती ।
झणझणा कळकिंकिणि वाजती ॥३॥
भरलिया दुरडया शिरिं गोरसें ।
सुख करीत जनां निज गौरसें ॥
पदसरोरुहिं घुंगुरु वाजती ।
श्रवण होऊनी लोक नवाजती ॥४॥
स्तनजघनभरानें सुंदरी नम्र झाल्या ।
श्रम किमपि न वाटे मध्य वाटेसि आल्या ।
अभिनवरसरागें गायनें गाति तानें ।
नव नवल पहातां देव येती येती विमानें ॥५॥
सुवदना हरिचें वन पावल्या ।
तरुतळीं क्षण एक विसांवल्या ॥
तरु समप्र विशेष विराजती ।
निजभवें विभवें हरि सेविती ॥६॥
अति रसाळ रसाळ विराजती ।
वितत ताल तमालहि साजती ॥
मलयमारुत शीतळ वाजती ।
कलरवीं किणी कोकिल कूजती ॥७॥
बिससिते कसि ते वरि नीरजें ।
अति सुगंधित हो अवनी रजें ॥
मनिहुनी यमनेमहि सांडिला ।
मुनिवरीं नवरीं ज्प मांडिला ॥८॥
ललत खेळत त्या ललनासवें ।
मदन तृप्त तया वदनासवें ॥
मुनिजनीं निजनीतिस टाकिलें ।
सुवदना वदनांबुज चिंतिलें ॥९॥
हळुहळू मलयानिळ वाजिला ।
मधुकरीं मधुर ध्वनि योजिला ॥
विचरताति वधूंसह सारसें ।
मदन माजत तो सहसा रसें ॥१०॥
बहुत गर्जति त्या शुकसारिका ।
पतिसवें मिळती अभिसारिका ॥
जळ पहा अमृतास समानसें ।
सुख करी बहुधा रस मानसें ॥११॥
दोंदा सदां दोंदिल वाढवीतो ।
हा वांकुडा लांकुडसा रहातो ॥
कुडा कुडें कार्य करीत आहे ।
धोंडयाच धोंडा तरि घालताहे ॥१२॥
लाख्यास लक्षी बहुसाळ चाळा ।
चांदा सदां चांदणिया निराळा ॥
पेंद्यास कांहीं करुणाच नाहीं ।
धना धना चिंतित सर्व पाहीं ॥१३॥
काळा तो कमळा कराल करळा बाळा बुळा आंधळा ।
भोळा नीळ धुमाळ ताल सरळा तोळा तिळा तादळा ॥
काळा कोकिळ कावळा खुळखुळा धाळा विरोळा तुला ।
हिंदोला पिवळा विशाळ बरळा वाचाळ तो पिंगळा ॥१४॥
कैसा तो नरसा विसा आणि पिसा दासा बसा लांबसा ।
मासा कापुससा भुसा आणि पिसा पोसा दसा पोरसा ॥
थोटा थोरकटा जळाल चिकटा गाटा गढू थीवटा ।
खोटा हाततुटा करी खटपटा मोठा दुटा धाकटा ॥१५॥
चंद्रावळी आणिक रंगमाळा ।
पद्मावती सोंमकळा सुशीळा ॥
तरंगिका चारु कुरंगनेत्रा ।
रंभा प्रभा रूपवती पवित्रा ॥१६॥
चंपावती चंपकपत्र नेत्रा ।
चंद्रप्रभा चंद्रमुखी सुनेत्रा ॥
हारावती हार तरंगितांगी ।
मनोहरा मानसरंगभंगी ॥१७॥
पुष्पावती कुंदसमान दंती ।
सुरंय रम्या रमणीय कांती ॥
बिंबाधरा मोहन मर्दितांगी ।
मदालसा ते सुरसा सुरंगी ॥१८॥
जयंतिका कामुक वैजयंती ।
जया पताका विजया जयंती ।
पीनस्त्नी सुंदर पीवरोरू ।
रंभोरू वामा कमनीय भेरू ॥१९॥
हंसस्वरा हंसगतावतंसी ।
हंसावरा मानसराजहंसी ॥
रत्नावळी रत्नकळा रसाळा ।
कामालया कामकळा सुशीला ॥२०॥
सुवर्णवल्लीवरि मंजरी ही ।
रंभावती भोगवती सती ही ॥
गानप्रिया गायन गर्गितांगी ।
सुगायनातें सुर्त प्रसंगीं ॥२१॥
आनंदिनी नंददिका सुकेशी ।
कृशोदरी मंजुळ मंजुभाषी ॥
सारावती चंपकवल्लि गा ती ।
चांपेइका ते तरते पहाती ॥२२॥
भाग्या म्हणे ‘भागति पाय तूसे ।
कडेवरी येउनि बैस मासे’ ॥
भागी म्हणे ‘पाय तुझाच टांगो ।
मेल्या कडेला तरि आग लागो’॥२३॥
‘मी कुब्ज गे ये कुबडीस जोडा ।
देईन ही लागुनि लाल घोडा’॥
‘मेल्या जळाल्या बदलीस काई ?।
घोडयास इच्छील तुझीच आई’ ॥२४॥
‘एकाक्षि हे काजळ फार ल्याली ।
एकाक्ष मी यास्तव नेत्र घालीं’ ॥
‘जळो तुझा तो तरि एक डोळा ।
तोडील तुझा तरि काळ लोळा’ ॥२५॥
‘खुणाविते हे मजलागिं बोटें ।
हिनेंच केलें जग सर्व थोटें ।
‘तूं थोंट गांठा बहुसाल खोटा ।
तुझ्या घरा होतिल तीन वाटा’॥२६॥

N/A

References : N/A
Last Updated : April 06, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP