मुक्तेश्वरांची कविता
' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना.
गुहागव्हरीं पर्वतमौळीं । नाना रमणीक वनस्थळीं ।
नदीपुलिनीं गंगाजळी । क्रीडा करी मनेच्छा ॥
द्रोणाचळीं चंद्राचळीं । मंदराचळीं विंध्याचळीं ।
मलयाचळीं हिमाचळीं । सुखसंमेळीं क्रीडती ॥
कनकमेरूचें रत्नशिखरीं । शीतळ हिमालय परिसरीं ।
रचताचळाचे पाठारीं । सुरतोपचारीं क्रीडती ॥
सोमकांत शीतळ स्थळीं । सूर्यकांत काश्मीराचळी ।
हेमभूमिके रत्नस्थळीं । सुखसंमेळीं क्रीडती ॥
कर्पूरकर्दळींचे वनीं । कुंकुमकेशर उद्भवस्थानीं ।
सुरतानंदें क्रीडती दोन्ही । मद्यपानीं मन इच्छा ॥
मानस सरोवर हंसतडागीं । सुवर्णपंकजवनपरागीं ।
प्रवाळवल्लीच्या सुरंगीं । सुख संभोगीं क्रीडती ॥
N/A
References : N/A
Last Updated : April 06, 2015
TOP