मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|
मुक्तेश्वरांची कविता

मुक्तेश्वरांची कविता

' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना.


पापशब्द पडतां कानीं । हृदयीं धडकळा क्रोधाग्नि ।
म्हणे, ‘दुरात्मिया ही वाणी । जळो तुझी पापिष्टा ॥
प्रळयवीज माथां पडो । हष्टि जळोनि जिव्हा झडो ।
कायेपासूनि प्राण विघडो ।तात्कालिक पैं तुझा ॥
भीमाकरीं जे केळवली । गदा नोवरी सुगुणायिली ।
वाडनिश्चयें तुज नेमिली । गोत्रधटिट निर्धारें ॥
बोहलें योजिलें रणतळवट । आयुष्य अवधीचा अंन्नपाट ।
हातेंसारूनि बळी वरिष्ठ । लग्न लावील स्वहस्तें ॥
रक्त हरिद्रा तनुलेपनीं । माथां अक्षता पायपिटणी ।
स्त्रियाप्रलाप पाद्यध्वनी  । सुखसोहळा भोगिसी ॥
ते गदा घेऊनि मांडीवरी  । रणमंचकीं निद्रा करीं ।
प्राणपारखे दवडूनिदुरी । मग एकांती पहुडें कां ॥

N/A

References : N/A
Last Updated : April 06, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP