विठ्ठल चित्रकवि
' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना.
छंद बंध वचनें अनुपम्यें ।
काव्यरीति वचने ननु रम्यें ॥
कमलनयन कान्हा जो उभा कुंजशाई ।
मुरलि मधुर नादें जो वळी लक्ष गाईं ॥
शतहिमरुचि लोपे गोपिका मध्यभागीं ।
हृदयिं धरिं मना तूं लुब्ध जो रासरंगीं ॥
वाणी पवित्र रघुनाथचरित्र गातां ।
तें आइका पतित पावन होय आतां ॥
हें पंडितांस विनती करणें न लागे ।
‘घ्या हो ! सुगंध’ मधुपांप्रति कोण सांगे ? ॥
‘धान्याचे बहु ढीग सत्य वरुते त्री त्यांतळीं मांडणें ।
पूर्वी पुस्तक पूजणें शकुन पैं त्यानंतरें पाहणें ॥
तीं ठायीं तिन पोफळें वरि फुलें चिंतूनियां ठेवणें ।
आदौ सर्ग तथा दशा दशकिंचा श्लोक क्रमें देखणें ॥’
‘ज्ञाता श्रीगुरु रत्नपीठ भुवनीं चिद्नत्नसिंहासनीं ।
हस्ताब्जीं वरदा भयें प्रियमता शांति क्षमा आसनीं ॥
सालंकार उदार पुस्तक पुढें शिष्या प्रबोधीतसे ।
वाक्यें ‘तत्त्वमसीति’ विठ्ठलकवी साष्टांग वंदीतसे ॥’
“मेघश्याम अनंगधान चपला सीता भजावी बुधीं ।
चौं हातीं वरदाभयें प्रतिधनुर्बाणीं क्रमें आयुधीं ॥
आत्माराम समस्त काम पुरवी वाचे सदां गाइजे ।
सालंकार उदार हास्य हृदयीं सद्विठ्ठलें ध्याइजे ॥१॥
N/A
References : N/A
Last Updated : April 06, 2015
TOP